Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : 'हनी ट्रॅप'वरुन भुजबळ बोलले, म्हणाले हे नाशिकचं दुर्देवं..

Chhagan Bhujbal reacts to honey trap case : नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू आहे. राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. अधिवेशनातही हे प्रकरण गाजलं.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू आहे. राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. याविषयावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

भुजबळ हे नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिंधीशी बोलत होते. आपल्याकडे याप्रकरणाबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता भुजबळ म्हणाले, माझ्याकडे काही माहिती नाही.

परंतु काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. कुठे हनी पण नाही अन् कुठे ट्रॅप पण नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे हा मुद्दा संपलेला आहे. स्वत:मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर शंकेला वाव राहू नये असं भुजबळांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री यांच्याकडेच गृहखातं आहे, त्यामुळे चौकशी करुनच त्यांनी स्टेटमेंट केलं असणार असही भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले, याप्रकरणात नाशिकची बदनामी झाली हे दुर्देवं आहे. नाशिकमध्ये अनेक गोष्टी घडत असतात. इतर काही गुन्हे शहरात घडतात. कधी रस्त्यावरुन आपलं नाव खराब होतं तर कधी मर्डर होतात, कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात. पण हे व्हायला नकोय पण ते आपलं दुर्देवं आहे असं भुजबळ यावेळी म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करायचे असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल असं विधान सुनिल तटकरे यांनी केलं आहे. या विधानाकडे तुम्ही कसं बघता असं विचारलं असता भुजबळ म्हणाले, ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांना अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तसं विधान केलं असेल. मुळात तसं काही घडतंय का हे सुद्दा पाहावं लागेल, मलाही माहिती नाही की असं काही घडतंय असं भुजबळ यांनी सांगितलं.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भामध्ये सध्या तरी कोणता विचार नाही. हे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. पण त्यांनी जर तसं करायचे असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय आणि केलेले वक्तव्य हे योग्यच आहे. कारण आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मित्र पक्षांना विचारात घेऊन त्यांचा सल्ला घेऊन निर्णय घेणं स्वाभाविक आहे असं भुजबळ म्हणाले.

विधानसभेत आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली, समर्थकांनी राडा केला. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मला आता ४२ वर्ष झाले विधानसभेत. परंतु माझ्या आयुष्यात तरी मी असं कधी झालेलं मी पाहिलेलं नाही. विधानसभा, विधानपरिषदेत एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या पक्षाचे आमदार टीका-टीपण्णी करत असतात. परंतु विधानसभेच्या बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं, थट्टा मस्करी करणे, एकमेकाला मदत करत होते. पण आता ही कटुता फारच वाढीला लागली आहे. त्यामुळे हे पाहिल्यानंतर आमच्यासारख्याला दुख: होतं असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT