Samta Parishad delegation with Nashik collector Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: समता परिषद आक्रमक; मराठा समाजाचा प्रश्न सोडवा, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही!

Chhagan Bhujbal; Mahatma Phule Samata Parishad warns Government Regarding Maratha Reservation issue-राज्य शासनाने कोणत्याही दबावाखाली येऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशारा.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: मराठा समाजारा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सर्वच यंत्रणा सक्रीय आहे. त्यामुळे या आंदोलनावर काय तोडगा निघतो याची प्रतिक्षा आहे. अखिल भारतीय सहात्मा फुले समता परिषद देखील याबाबत सक्रीय झाली आहे.

समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या आरक्षणात काही बदल अथवा कोणीही नवा घटक त्यात समाविष्ट करू नये, असा इशारा देण्यात आला.

गेल्या चार-पाच दिवसापासून मुंबई येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते इतर मागसवर्ग कोटयातुन आरक्षणाची मागणी करत आहे. त्यामुळे ओबीसी समाज घटकांत अस्वस्थता असल्याचा दावा करण्यात आला.

वास्तवीक मराठा समाजाला सद्यस्थिती मध्ये खुल्या गटातुन, एसईबीसी, ईबी़ब्ल्यूएस आणि कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जात आहे. तसेच त्याचा लाभ मराठा समाज घेत आहे. तरी पण आंदोलनकर्त यांची मागणी इतर मागासवर्ग ओबीसी कोटयातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आहे.

ओबीसी प्रवर्गात अतिशय अल्प आरक्षणाच्या कोटयामध्ये ३७४ जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो. असे असतांना जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजातील जात बांधवांना आरक्षण हे नावापुरते शिल्लक राहिल. ज्या समाजाने समाजव्यवस्थेमध्ये वर्षानुवर्ष-पिढ्यान पिढ्या समाजिक व आर्थिक मागसलेपण भोगले आहे. त्यावर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नये. अन्यथा अखिल भारतीय महात्मा ज्योतीबा फुले समता परिषदेमार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, रूपाली पठारे, सचिन जगझाप, अमोल नाईक, भालचंद्र भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT