Chhagan Bhujbal News: राज्यात तिहेरी भाषेच्या धोरणावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात हिंदी सक्ती करणे अशक्य आहे.
तीन भाषेच्या धोरणात हिंदी भाषेचा पहिलीपासून समावेश करण्याचे सरकारचे संकेत आहेत. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र निषेध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी भाषा वाचविण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे.
यानिमित्ताने गेले काही दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे. येत्या आठवड्यात मराठीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामुळे देखील राज्यभरात एक वेगळा राजकीय संदेश गेला आहे.
यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अवघड आहे. ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी यापूर्वी देखील अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र त्याला यश आले नाही. सध्याच्या स्थितीत तरी तशी परिस्थिती नाही, असा दावा भुजबळ यांनी केला.
तेरी भाषेच्या धोरणावरही भुजबळ यांनी पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. सिनेमा आणि अन्य माध्यमातून हिंदी भाषा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत याआधीच पोहोचली आहे. त्यामुळे तिचा पहिलीच्या विद्यार्थ्यांवर बोजा लादणे योग्य होणार नाही. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणे देखील शक्य नाही, असे भुजबळ म्हणाले.
महायुती सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध बैठका झाल्या आहेत. मात्र या तयारी बाबत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. प्रयागराज चा कुंभमेळा शहरापासून लांब भरतो. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक शहरात होतो. सध्या शहरात जागेची कमतरता आहे. तसेच कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरीची स्वच्छता आणि तिचे प्रदूषण दूर करणे हा प्राधान्याचा विषय असला पाहिजे, असे ते म्हणाले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.