Babanrao Lonikar politics: संतप्त शेतकरी संघटनेचा इशारा, आमदार बबनराव लोणीकर यांना नाक घासायला लावू!

Babanrao Lonikar; Farmers' organizations should apologize for aggressive, defamatory statements by Lonikar-भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर (जालना) येथे शेतकरी आणि महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याने संताप
MLA-Babanrao-Lonikar
MLA-Babanrao-LonikarSarkarnama
Published on
Updated on

Babanrao Lonikar News: भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने ही त्यांना फैलावर घेतले आहे. बबनराव लोणीकर यांच्या विरोधात शेतकरी संघटनेने थेट इशारा दिला आहे.

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आक्रमक होत बबनराव लोणीकर प्रकरणात उडी घेतली आहे. बबनराव लोणीकर यांना भाजप आणि राज्य सरकार का वाचवते आहे? असा प्रश्न त्यांनी केला. लोणीकर यांना राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

भाजप आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. महिला आणि भगिनींना लाडकी बहीण योजनेतील पैसे देखील नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळत आहेत. तुझ्या मायचा पगार आणि बापाची पेन्शन आम्हीच दिली आहे, यांसह शेतकऱ्यांचा अवमानकारक उल्लेख केला होता.

MLA-Babanrao-Lonikar
Kunal Patil Politics: कुणाल पाटील पाऊणशे वर्षांची काँग्रेसची बांधिलकी तोडणार, भाजप प्रवेश निश्चित!

यासंदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. लोणीकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि मानहानी करणारे बोल लोणीकर यांचे नसून त्यांच्या पक्षाची ती भूमिका आहे काय?. शेतकरी हा काही भाजपचा घरगडी नाही. त्यामुळे लोणीकर यांनी तातडीने माफी मागून राजीनामा द्यावा.

आमदार लोणीकर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सर्व थरातून त्यांचा निषेध होत आहे. शेतकरी संघटनांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमदार लोणीकर यांना धडा शिकवू असा इशारा दिला होता.

या सर्व प्रतिक्रिया उमटल्यावर देखील आमदार लोणीकर यांनी सर्व सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. माफी न मागता आपण केलेले वक्तव्य कसे योग्य आहे हे वरिष्ठांना पटवून देऊ, असा लोणीकर यांचा दावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज समज दिली आहे. मात्र त्यानंतरही लोणीकर माघार घेण्यास तयार नाहीत.

लोणीकर यांना नाक घासून शेतकऱ्यांची माफी मागायला लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोराडे यांनी दिला आहे शेतकऱ्यांना कंगाल बनविण्याचे धोरण सध्याच्या सरकारने राबविले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात जीएसटी लागू करण्यात आले आहे. एकीकडे शेतकऱ्यांची लूट करायची आणि दुसरीकडं त्यांचा अपमान करायचा, असे दुहेरी शेतकरी विरोधी काम भाजप करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com