Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी दावा फेटाळला, राजदीप सरदेसाई यांच्यावर करणार कारवाई!

Rajdeep Sardesai Book Controversy: पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात भुजबळ यांनी ईडी पासून सुटकेसाठी भाजप सोबत गेल्याचा दावा केला आहे.

Sampat Devgire

Mumbai News: पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकारणात नवे तरंग उमटले आहेत. या पुस्तकात छगन भुजबळ यांच्या विषयी खळबळ जनक दावा करण्यात आला आहे. त्यावर मंत्री भुजबळ यांनी तातडीने खुलासा केला आहे.

पत्रकार सरदेसाई यांनी निवडणुकी संदर्भात लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकातील काही अंश असलेल्या बातम्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातमीतील दाव्याने मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ईडी ची कारवाई टाळण्यासाठी मंत्री भुजबळ भारतीय जनता पक्षासोबत गेले. मंत्री छगन भुजबळ यांच्या वरील कारवाई बाबत अन्य काही दावे या बातमीत करण्यात आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या संदर्भात आज मंत्री भुजबळ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आपली भूमिका मांडली. पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्याचा त्यांनी इन्कार केला. मी कोणत्याही दैनिकाला अथवा अन्य कोणाला मुलाखत दिलेली नाही.

त्यामुळे ईडी संदर्भात मी कुठला दावाही केलेला नाही. त्यामुळे हे सर्व दावे आणि बातम्या तत्थ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित पुस्तक आपण वाचलेली नाही. लवकरच ते पुस्तक वाचणार.

आमच्या वकिलांनाही ते पुस्तक देण्यात येईल. निवडणुका झाल्यावर त्याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, याचा निर्णय आम्ही घेऊ असे भुजबळ यांनी सांगितले.

मंत्री भुजबळ म्हणाले, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असतानाच न्यायालयाने मला महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीन चीट दिलेली आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पेढे देखील भरवले होते. त्यामुळे या दाव्यात फारसे तथ्य नाही.

मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडी ची कारवाई झाली. असा दावा या पुस्तकात भुजबळ यांच्या विषयी केलेला आहे. ते म्हणाले, हे सर्व तथ्यहीन आहे. ओबीसी असल्यामुळे कारवाई झाली, हे मी मानत नाही.

अनेक बिगर ओबीसी नेत्यांवर देखील खटले दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ओबीसी असल्यामुळे कारवाई झाली, हे मला मान्य नाही. आम्ही सर्व ईडीची कारवाई टाळण्यासाठी भारतीय जनता सोबत गेलो, या दाव्याला काहीही अर्थ नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 54 आमदारांनी या संदर्भात पाठिंबाच्या पत्रावर सही केली होती. त्यातील सुमारे 42 आमदार सध्या सरकार बरोबर आहेत. यातील अनेक आमदारांचा ईडीच्या कारवाईची काहीही संबंध नाही.

या प्रकरणात आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षासोबत गेलो, हे वारंवार सांगितलेले आहे. आज आमच्या मतदारसंघात विविध विकास कामे झाली आहेत. त्याचे श्रेय राज्य सरकारलाच द्यावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT