Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, भुजबळ असं का म्हणाले?

Chhagan Bhujbal On Nagpur and Yeola : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. भुजबळ येवल्यात बोलत होते.

Ganesh Sonawane

Yeola Muktibhumi : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला मुक्ती भूमी धर्मांतर घोषणा दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुक्ती भूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येवला मुक्तीभूमी या स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मुक्तीभूमीमध्ये ३० कोटी रुपये निधी खर्च करून या स्थळाचा परिपूर्ण विकास करण्यात आलेला आहे.

सदरील जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १३ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तर टप्पा २ अंतर्गत येवला मुक्तीभूमी स्मारक परिसरात अंतर्गत प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, भिक्कू निवासस्थानांचे बांधकाम, प्रशासकीय कार्यालय, भिक्कू पाठशाला, पाली व संस्कृत संशोधन केंद्र, ग्रंथालय खोली, आर्ट गॅलरी खोली, दृक्षश्राव्य खोली, संरक्षण भिंत, अॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथिगृह यासह विविध विकास कामे करण्यात येऊन स्मारकाचा विकास करण्यात आला आहे. यापुढील काळातही विविध विकास कामे करून मुक्ती भूमी स्थळाचा विकास करण्यास आपले प्राधान्य असणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, भगिनाथ पगारे, संजय पगारे,दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, मकरंद सोनवणे, समाधान पगारे,सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT