Chhagan Bhujbal : मी फार फार तर मोदीसाहेबांकडे जाईल, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal statement Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन इच्छुक मंत्र्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. आता भुजबळांनी देखील यावरुन मोठे विधान केले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : आगामी कुंभमेळा जवळ आल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाला महत्व आहे. परंतु अद्यापही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे. अशात आता या तिघांमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्रीपदारुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच काही दिवस झाले. अहिल्यानगर येथे दादा भुसेंना यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न केला होता. तेव्हा नाशिक पालकमंत्रीपदाचा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल असं भुसे म्हणाले होते. त्यावर गप्प राहतील ते महाजन कसले. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही ट्रम्प व भुसे यांचे घनिष्ठ संबंध असतील. ते त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवतील असा चिमटा काढला होता.

आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही महाजन व भुसे यांना त्यावरुन उपरोधिक टोला लगावला आहे. नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींनी त्यांना महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे का ? असा सवाल केला. त्यावर भुजबळ म्हणाले, मी पण ऐकलं ते की महाजन भुसे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार आहेत. पण मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही. मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. अन् फारच झालं तर मोदी साहेबांकडे जाईन.. यापेक्षा लांब मी जाणार नाही, ती मंडळी जाऊ शकते असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Girish Mahajan : डोनाल्ड ट्रम्प अन् दादा भुसेंचे घनिष्ट संबंध, गिरीश महाजनांनी हसत हसत चिमटा काढला

दरम्यान, आगामी निवडणुकासंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं. प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही. तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित पवार यांची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप व अजित पवार युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालये होणार समृद्ध!

दरम्यान आनंदाचा शिधा यंदा का नाही ? यावर विचारले असता. आनंदाचा शिधा यावेळी अडचणीत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च झाला. सध्या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अडचणीत असून ३२ हजार कोटी वाटायचे आहे. त्यामुळे काही योजना अडचणीत आहे. पुढच्या वेळी नक्की विचार करू असे भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com