Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal news : ' ...त्यांनी थोडा गोळीबार करायला सांगितला होता!'; गृहमंत्री फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

Sampat Devgire

Bhujbal on Supriya Sule: शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) कल्याण शहर प्रमुखावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. या प्रकरणाने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध राजकीय नेत्यांनी याबाबत राज्य सरकारवर गंभीर टीका केली. (Supriya Sule Comment on Devendra Fadnavis)

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस यांच्यावर टीका करताना पोलिस ठाण्यातच जर असे प्रकार घडत असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचे काय? याबाबत राज्य सरकार कशा प्रकारचे काम करत आहे. याचे उदाहरण सगळ्यांपुढे आले आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. (Bhujbal on Supriya Sule)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण शहरात पोलिस ठाण्यातच भाजप आमदार गणपतराव गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केल्याने गृहमंत्री फडणवीस टीकेचे लक्ष झाले आहेत. मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ फडणवीसांच्या मदतीला धावून आले आहेत. भुजबळ यांनी गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)यांचा बचाव केला.

नगर येथे आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी आलेल्या भुजबळांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, 'शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुखावर गोळीबार झाला हे खरे आहे. असे प्रकार घडू नयेत. मात्र यात गृहमंत्री फडणवीस यांचा थेट काय संबंध येतो?. आमदार गायकवाड यांना फडणवीस यांनी गोळीबार करायला थोडीच सांगितले होते. त्यामुळे याबाबत होणारी टीका अनाठायी आहे. पोलिस यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करेल. त्यामुळे गृहमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही.'

भुजबळ म्हणाले,' मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढतो आहे. त्यामुळे मला देखील एका आमदाराने शिवीगाळ केली. त्याची ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आहे. मग मी काय करायचे? असा प्रश्नही त्यांनी केला.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT