Supriya Sule Pune News :
कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री ही घटना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने कायदा हातात घेतल्याने आता त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे संर्वांचे लक्ष लागले आहे.
आता या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत जे बोलतात ते काही लोकांना आवडत नाही. मात्र ते सांगतात त्याचप्रमाणे सध्या कॅबिनेटमध्येच नाही तर, आता रस्त्यावरही सत्ताधाऱ्यांमध्ये गॅंगवॉर सुरू झाला आहे. पोलीस स्टेशनमध्ये अशाप्रकारे सत्ताधारी पक्षाचा आमदार फायरिंग करणार असेल तर, कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी Supriya Sule यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला नाही तर, हा विषय लोकसभेत मांडणार आहे. वेळप्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची या प्रकरणी भेट घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
जेव्हा जेव्हा गृहमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा राज्यात क्राईम वाढत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. एखाद्या सिरीयलमध्ये ज्या प्रकारे गोळीबाराच्या घटना घडतात त्या प्रकारे राज्यामध्ये क्राईमच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या सरकारने राज्याला टीव्ही सिरीयल करून ठेवले आहे, अशी टीका त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने नैतिकता गमावली आहे. सध्याची परिस्थिती बघता हे लोक तुम्हाला मलाही गोळ्या घालायला कमी करणार नाहीत, अशी भीती सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या सरकारला केंद्र सरकारने तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना भेटून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांना टोला
सुप्रिया सुळे यांना त्या अंजली दमानिया यांच्या संपर्कात आहेत का? याबाबत विचारला असता त्या म्हणाल्या मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या संपर्कात राहत असते. मी इतरांप्रमाणे हुडी घालून लपून-छपून कोणाची भेट घेत नाही. मी लोक प्रतिनिधी म्हणून ओपनली सगळ्याशी भेट घेते, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लागावला.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.