Chhagan Bhujbal News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या मतदारसंघातील रस्त्यांचा मार्ग झाला मोकळा

Minister Bhujbal received funds for his Constituency : मंत्री भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांना निधी मिळाला आहे.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : पुरवणी अर्थसंकल्पात रखडलेल्या अनेक कामांना चालना मिळाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघालाही लाभ झाला आहे. राज्याचे मंत्री असल्याने भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात विविध कामांना प्राधान्य दिले आहे.

वरिष्ठ नेते असल्याने प्रशासनाकडूनही या कामांना चालना दिली जाते. आता येवला तालुक्यातील विविध रेंगाळलेल्या रस्त्याच्या कामांनाही त्याचा लाभ झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांना विना चर्चा मंजूरी मिळाली. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघातील रस्त्यांसाठी 23.51 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते पूल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या निवास स्थानाच्या कामांचा समावेश आहे.

यानिमित्ताने काही नव्या व प्रदीर्घ काळ अडलेल्या रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने लवकरच ही कामे सुरू होतील. येवला मतदारसंघातील दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतील. तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक आठ ते नांदेसर आडगाव हा प्रमुख रस्ता यामध्ये आहे. जिल्हा मार्ग क्रमांक 80 या रस्त्याच्या सुधारणेसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अनकाई कुसमाडी नगरसुल अंदरसुल पिंपळगाव जलाल रोड ते राज्य महामार्ग 451 या रस्त्याच्या सुधारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव पाटोदा हा रस्ता आणि पुल तसेच गाजरवाडी ते नांदूर मधमेश्वर ग्रामीण महामार्गावरील पुलासह रस्त्याच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या कामांमुळे मतदारसंघाचा विकासाचा एक प्रमुख प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचा लाभ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला होऊ शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT