Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange News: ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघासाठी वेगळा निर्णय घेणार आहेत.
जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात दौरे करीत आहेत. सध्या ते धाराशिव येथे गाठीभेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते धाराशिव येथे त्यांची भेट घेणार आहेत.
यावेळी पुढील राजकीय धोरण ठरविण्यात येईल. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज येवल्याहून धाराशिवला रवाना झाले आहेत. धाराशिव (Dharashiv) येथे बैठक झाल्यानंतर सायंकाळी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात येवल्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना येवला मतदार संघाचा दौरा करण्याची विनंती केली होती. जरांगे पाटील यांनी देखील लवकरच येवला येथे समाज बांधवांशी संवाद करू असे आश्वासन दिले होते.
या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसी (OBC Reservation) संघटनांनी जणांनी पाटील यांच्या विरोधात उपोषण केले होते. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, या विरोधात हे आंदोलन होते.
ओबीसी आंदोलनातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मराठा समाज आणि जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांच्या विरोधात नव्याने राजकीय भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
येवला मतदारसंघात आणि विशेषतः लासलगाव परिसरातील 42 गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत येवला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळ्या निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत आज धाराशिव येथे होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या बैठकी काय निर्णय होतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.