Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : येवल्यातून विरोध, मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढावे!

Sampat Devgire

Maratha Reservation issue : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. मतदारसंघातून अशी मागणी झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.(Chhaagan Bhujbal criticized CM & Government administration on Kunbi cast policy)

येवला-लासलगाव (Nashik) मतदारसंघातील पदाधिकारी, मतदारांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री तसेच राज्य शासनाने कुणबी पुरावे शोधण्याबाबत घेतलेल्या (Maratha Reservation) निर्णयावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. हा मंत्रिमंडळाच्या संकेतांचा भंग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न तसेच उद्या (ता. १७) अंबड (जालना) येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण परिषदेच्या हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर वळण घेऊ लागला आहे. आज या संदर्भात मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कृती समितीचे व गावपातळीवर काम करणाऱ्या प्रतिनिधींनी शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

हनुमाननगरचे सरपंच गोपीनाथ ठुबे, येवला बाजार समितीचे संचालक सचिन आहेर, महेश काळे, जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे, अंदरसुलचे नाजी सरपंच झुंजारराव देशमुख, योगेश जहागीरदार, दिनेश पागीरे, तेली समाज संघटनेचे किशोर बागूल यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपालांना निवेदन पाठविले आहे. ते म्हणाले, आमच्या मतदारसंघातून निवडून आलेले व सध्या आपला मूळ पक्ष सोडून त्यातून बंडखोरी करून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलेल्या भुजबळ यांनी पद व गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. राज्य घटनेनुसार घेतलेली शपथ तसेच मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीच्या संकेताचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, आमच्या मतदारसंघातून निवडून आलेले व सध्या आपला मूळ पक्ष सोडून त्यातून बंडखोरी करून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलेल्या भुजबळ यांनी पद व गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. राज्य घटनेनुसार घेतलेली शपथ तसेच मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीच्या संकेताचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजाचा द्वेष करीत अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित केली आहे. त्यातील मागण्या, माध्यमांना दिलेल्या मुलाखती, यातील त्यांची भाषा नियमबाह्य, चिथावणीखोर व मराठा समाजाविषयी द्वेषपूर्ण वाटते. समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही हाच कल आहे. मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी आहे.

सरकार स्तरावर तसा कोणताही विचार नसताना ही मागणी करून मंत्री भुजबळ आपल्या राजकीय लाभासाठी, तसेच ओबीसी घटकांमध्ये नसलेली लोकप्रियता मिळविण्यासाठी हे सर्व करीत आहे. असे विविध आक्षेप या पत्रात आहेत. त्यामुळे समाजात दुही निर्माण होत आहे. हे कल्याणकारी राज्याच्या मलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT