Raj Thackeray On Amit Shah : अमित शाहांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवावं...; अयोध्यावारीवरून राज यांचा ठाकरी टोला!

Raj Thackeray On Amit Shah : "राम मंदिर दर्शनाचे आमिषं कसली दाखवताय? "
MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, Mumbai
MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशात पाच राज्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस यांनी या निवडणुकांसाठी ताकद पणाला लावली आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना सत्तेत आल्यास रामलल्लाचं दर्शन मोफत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शाहांवर मिश्किल टिप्पणी केली आहे. (Latest Marathi News)

image-fallback
#Shorts आमदार राजू कारेमोरे थिरकले गाण्यावर, पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ | Raju Karemore | NCP |

अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लाचं मोफत दर्शन देणार असं आश्वासन दिलं आहे, "यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले, "अमित शाह यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडण्याची तयारी केली असावी. तुम्ही काय कामं केली याच्यावरती निवडणुका लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिषं कसली दाखवताय? इतकी वर्षे सत्तेत आहात तर काय काय गोष्टी केल्या? हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. "

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, Mumbai
Nanded BJP News : भाजप जम्बो कार्यकारिणीला `मिशन ४५ प्लस`चे आव्हान पेलावे लागणार...

राज ठाकरे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "राज्यात राजकीय विचका झाला आहे. राज्याची अशी घाणेरडी परिस्थिती कधीच नव्हती, पण यावर आता मतदार काही करतात का हेच पाहायला लागेल. उमेदवारांना मतदारांचा धाक राहिला पाहिजे. राज्यात जे काही चाललंय सगळं संभ्रमात पाडणारं आहे," असे राज ठाकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com