Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack : छगन भुजबळ संतप्त; सांगितली पहलगाम हल्ल्यामागची `ती` कारणे!

Chhagan Bhujbal; Pahalgam terror attack is an attack on entire Country-दहशतवाद्यांना काश्मीरी नागरिकांचा विकास पहावत नाही, पहलगामचा हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : मंगळवारी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. हा हल्ला हे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान आहे. यातील दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची गरज असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यातील मृतांना माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेने अतिशय धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यादृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा स्वतः लक्ष घालत असून त्यांना त्यात यश मिळेल.

या घटनेत पर्यटकांना मारताना ते मुसलमान नाहीत याची खात्री करून मारण्यात आले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून हा हल्ला म्हणजे आपल्या संपूर्ण देशावर झालेला हल्ला आहे. मुंबई तसेच अक्षरधाम मध्ये झालेल्या हल्ल्याप्रमाणे हा मोठा हल्ला असून तीव्र निषेध करावा असा हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र आणि तेथील स्थानिक राज्यसरकारकडून काश्मिरी नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशा सुधारणा करण्यात येत आहे. या होणाऱ्या सुधारणा पाकिस्थानी दहशतवाद्यांना पाहवत नसल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे दिसते आहे. या दहशत वाद्यांना काश्मीरचा विकास नको आहे. त्यांना याठिकाणी दहशत निर्माण करून संपूर्ण जगात याबाबत चुकीचा गैरसमज पसरविण्याचा तसेच देशातील हिंदू मुस्लीम नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

याबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केला आहे.या घटनेबाबत देशातील मुस्लीम नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून जे मारले गेले ते आमचे हिंदुस्थानी बंधू आहे हा हल्ला आम्ही कदापीही सहन करू शकत नाही हे म्हटले आहे. त्यातून देशाची एकता जगासमोर येईल आणि दहशतवाद्यांना देखील चपराक बसेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT