Chhagan Bhujbal, Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: आत्मविश्वास वाढलेले भुजबळ म्हणतात, लाडकी बहीण महायुतीला तारणार!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: राज्यातील महायुती सरकार विषयी राजकीय सर्वेक्षणात अनुकूलता नव्हती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनाही धडकी भरली होती. सध्याच्या स्थितीत मात्र नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारने चांगलाच धसका घेतला होता. सर्वच नेते याबाबत सावध पावले टाकत होते. याबाबतची विधाने देखील तशीच होती. आता हे चित्र बदलेल. असा विश्वास महायुतीच्या सरकारमधील मंत्र्यांना वाटू लागला आहे.

या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आम्ही लाडकी बहीण आणि अन्य योजना जाहीर केल्या. त्यावर कार्यवाही केली.

लोकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. जवळपास एक कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी अद्यापही फॉर्म भरलेले नाहीत, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.

कार्यकर्ते अर्ज न भरलेल्या महिलांचे देखील फॉर्म भरून घेतील. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या दीड कोटीच्या आसपास होईल. त्याचा अतिशय चांगला परिणाम आणि वातावरण राज्यात झालेले दिसते आहे.

मंत्री भुजबळ म्हणाले, या योजनेमुळे लाडक्या बहिणींना मिळालेले पैसे हे राज्यातील राजकीय वातावरण बदलण्यास महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारला त्याचा लाभ होईल. या योजनेचे अतिशय उत्साहात स्वागत होत आहे. अनेक महिलांनी याचा आनंद उत्सव साजरा केला आहे कार्यकर्त्यांनी देखील याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे.

विरोधकांनी काळजी करू नये. गेल्या आठवड्यातील निवडणूक सर्वेक्षण अटीतटीचे अथवा बरोबरीचे असेल, तर आता आमच्या लाडक्या बहिणींमुळे पुन्हा एकदा राज्यात आमची सत्ता येईल. लाडक्या बहिणीच महायुतीला तारतील, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT