Chhagan Bhujbal : नाशिकमधील जरांगे-पाटलांच्या रॅलीतील गर्दीवरून भुजबळांनी डिवचलं; थेट आकडाच सांगितला

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : भुजबळांनी जरांगे-पाटलांना डिवचल्यानं दोन्ही नेत्यांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

मराठा नेते, मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील 'शांतता रॅली'ला सोलापुरातून सुरूवात झाली. तर, नाशिकमध्ये त्यांच्या 'शांतता रॅली'ची सांगता सभा झाली. यावेळी नाशिकात जाऊन जरांगे-पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांना आव्हान दिलं होतं.

त्यासह नाशिक हा भुजबळांचा नाहीतर मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, असं म्हणत जरांगे-पाटलांनी आव्हान दिलं होतं. यातच आता छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी जरांगे-पाटील यांच्या नाशिकमधील रॅलीवर प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच, जरांगे-पाटील यांच्या नाशिकमधील सभेला किती लोक आली होती, याचा आकडाच छगन भुजबळ यांनी सांगितला आहे.

Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Bhujabal Vs Jarange: जरांगे मुख्यमंत्री होणार, आपलं वागणं सुधारा; भुजबळ असं का म्हणाले?

"जरांगे-पाटलांकडे आता कोणी लक्ष देत नाही. नाशिकच्या सांगता रॅलीला 5 लाख लोक येणार होते. पण, प्रत्यक्षात 8 हजार लोक सहभागी झाले होते," अशी खिल्ली छगन भुजबळ यांनी उडवली आहे.

"आंदोलन सुरू झाल्यापासून जरांगे-पाटील मला शिव्या देत आहेत. मला शिव्या देण्याचं काय कारण? आगामी निवडणुकीत 288 मतदारसंघात उमेदवार द्या, त्यांच्यासाठी तयारी करा, मला शिव्या देऊन काय फायदा आहे. तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या," असा खोचक सल्ला छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांना दिला आहे.

Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Manoj jarange Patil: जरांगे पाटलांची ती भूमिका छगन भुजबळ यांच्या पथ्यावर?

"तुमचे उमेदवार निवडून येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार आहात. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिव्याशाप देऊन चालत नाही. आत्तापासून आपलं वागणं सुधारलं पाहिजे," असा टोला भुजबळांनी लगावला आहे. भुजबळांनी जरांगे-पाटलांना डिवचल्यानं दोन्ही नेत्यांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com