Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : बारामतीचा प्रश्न विचारताच छगन भुजबळांनी गप्प राहणेच पसंत केले!

Sampat Devgire

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषय येताच भुजबळ यांनी पुढचा संवाद टाळत पत्रकार परिषद उरकली. (Chhagan Bhujbal clears that NCP will fight in four Constituencies of Maharasthra)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाने (Ajit Pawar) राज्यातील चार लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असे जाहीर केले आहे. गेली पन्नास वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा घरचा मतदारसंघ अशी बारामती (Pune) मतदारसंघाची ओळख आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात नुकतेच बारामती तसेच मुंबईत सुनेत्रा पवार यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. हे फ्लेक्स लावल्यानंतर त्यावर जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर हे फ्लेक्स काढून घेण्यात आले, मात्र ते कोणी लावले, त्याचा राजकीय अर्थ काय यावर राज्यभर चर्चा सुरू झाली.

या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत चार मतदारसंघात अजित पवार गट उमेदवार देणार, त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी चार मतदारसंघांची नावे सांगत, पक्षाने तशी घोषणाच केल्याचे सांगितले. त्यानंतर बारामती मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा अजित पवार अशी लढत होईल का?. या दोघी एकमेकांविरोधात उमेदवारी करतील का?. असा प्रश्न झाला. त्यावर भुजबळ यांनी गप्प राहणेच पसंत केले. पुन्हा विचारल्यावर ते म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. त्यानंतर लगेचच त्यांनी पत्रकार परिषद आवरती घेत, ते निघून गेले.

एरव्ही मराठा आरक्षणाच्या संवेदनशील प्रश्नासह विविध विषयांवर भुजबळ भरभरून बोलले. अगदी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतानाच, कुणबींना आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही, त्या विषयावर आपण न्यायालायत जाऊ असे देखील सांगितले. मात्र बारामती, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हा विषय निघताच, ते गप्प झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT