Chhagan Bhujbal,Sunetra Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : तर समीर भुजबळांना मंत्रीपद द्यावे, भुजबळांच्या मागणीने सुनेत्रा पवारांसमोर पेच?

Rajya Sabha Bypoll Announced After Sunetra Pawar Resignation : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक घोषित झाली आहे. येत्या ८ जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरु असल्याची चर्चा आहे. तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. अन्य काही नेत्यांचीही नावे चर्चेत असली तरी भुजबळांचे नाव आघाडीवर आहे.

मंत्री भुजबळ यांनीही यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केलेली होती. लोकसभा निवडणूकीवेळी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे नाव सूचवले होते. त्यामुळे याहीवेळेला त्यांच्या नावासाठी भाजप अनूकूल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही त्यांचे नाव निश्चित होऊ शकते.

परंतु राज्यसभेची उमेदवारी दिल्यास पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वासमोर अर्थात सुनेत्रा पवार यांच्यासमोर भुजबळ यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

तसेच स्वत: भुजबळ नवी दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. मात्र, पक्षनेतृत्वाने आग्रह केल्यास ते जाऊ शकतात. मंत्री भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागेवर येवल्यात विधानसभा पोटनिवडणूक होईल. तेथून समीर भुजबळांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. मात्र, समीर भुजबळ निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र आता भुजबळांनीच समीर भुजबळ यांचे पुनर्वसन व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते आहे. त्यामुळे समीर भुजबळांना मंत्रिपद दिले जावे अशी मागणी भुजबळांनी पक्षनेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे.

पुन्हा पोटनिवडणूक

सन 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची मुदत शिल्लक असतानाही त्यांना 2024 च्या द्विवार्षिक निवडणुकीत उमेदवारी दिली होती. राज्यसभेवर नव्याने निवडून आल्यानंतर पटेल यांनी राज्यसभेच्या एका जागेचा राजीनामा दिला होता.

त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीद्वारे राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. आता त्यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत होती. आता याच जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक होत असल्याने पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT