Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : 500 कोटींवर कोण विश्वास ठेवेल? जरांगेंची ऑडिओ क्लिप म्हणजे निव्वळ गप्पा, भुजबळांचा टोला

Chhagan Bhujbal Reacts to Manoj Jarange Patil’s Audio Clip : मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लीपवर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. ऑडिओ क्लीप केवळ गप्पा असून त्यावर आपला विश्वास नसल्याचे भुजबळ म्हणाले.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Audio Clip : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावावर भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जरांगे यांनी गुरुवारी (दि. २२) पत्रकारपरिषद घेत पुरावा म्हणून एक ऑडिओ क्लीप ऐकवली. या क्लीपची सरकारने चौकशी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या विषयावर आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, माझे स्पष्ट मत आहे की, ऑडिओ क्लीपच्या केवळ गप्पा आहेत. दोन-चार जण एकत्र जमल्यानंतर पारावर गप्पा करतात तशा स्वरुपाच्या या केवळ गप्पा आहेत. गप्पांमध्ये कोण काहीही बोलतं, कुणी तरी रेकॉर्ड केलं आणि ते बाहेर आलं. त्यामुळे यावर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचं भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, मुळात ज्या गोष्टीची चौकशी करायची त्यावर आधी विश्वास तर बसला पाहीजे. ५०० कोटी कशाला म्हणतात? भाजपला पैसे द्यायचेच असते तर ते भाजपच्या मंत्र्यांनीच थेट जरांगेंना दिले असते की, ते शिंदेंना कशाला पैसै देतील. बरं ५-१५ कोटी म्हटले असते तर ठीक ये, त्यावर कुणी विश्वास तरी ठेवला असता. पण ५०० कोटी म्हणजे काहीही वाटेल ते बोलण्यात अर्थ नाही.

५०० कोटीच्या आकड्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या निव्वळ गप्पा आहेत, त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. अर्थात दोन वर्षांनी ही क्लीप बाहेर काढून जरागेंना काय फायदा होणार आहे, हे मला कळत नाही. जरांगेच्या जवळचेच लोक त्यांना काहीतरी सांगत असतात, त्या गोष्टी बाहेर येत आहेत. पण माझा त्यावर विश्वास नाही. आणि इतरही कुणी त्यावर विश्वास ठेवणार नाही.

जरांगेच्या टार्गेटवर सुरुवातीला भुजबळ, नंतर फडणवीस होते, नंतर विखे होते आता शिंदे आहेत. यावर विचारले असता, भुजबळ म्हणाले, एकालाच टार्गेट करुन प्रसिद्धी मिळत नसेल म्हणून ते टार्गेट बदलत असावे. लोकशाहीने त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय त्यामुळे बोलतात, पण 'पब्लिक सब जानती ये' असा डॉयलॉग भुजबळांनी मारला.

जरांगेंना क्लीप बाहेर काढायचीच होती तर त्याचवेळी का काढली नाही. दोन वर्ष का जाऊ दिले. त्याचवेळी बाहेर काढायची होती, त्यांना काही मुद्दे डायव्हर्ट करायचे असतील असं भुजबळ म्हणाले.

म्हणून क्लीप बाहेर आली का?

शिंदेंसेनेतील मंत्री-आमदार एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवत आहेत. त्यामुळे हा विषय बाहेर आल्याची चर्चा आहे. त्यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, त्यावर मला काही बोलायचे नाही. जो नगरसेवक होतो त्याला आमदार व्हायचे असते, जो आमदार होतो त्याला मंत्री व्हायचे आहे. जो मंत्री होतो त्याला मुख्यमंत्री व्हायची अपेक्षा असते. प्रत्येकजण अपेक्षा करत असतो, अपेक्षा ठेवणे काही चुकीचे नाही असे भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT