Nashik Crime : पोलिस शिपायाला ठार करण्यासाठी ५० लाखांची सुपारी; आंतरजातीय विवाहाचा राग, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime, Police Constable Threat : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पोलिस शिपायाला शिविगाळ करुन, तसेच त्याच्या हत्येसाठी ५० लाखांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
Nashik Crime
Nashik CrimeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Crime : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पोलिस अंमलदाराला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबधित अंमलदाराच्या हत्येसाठी ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात एका कंपनीचा ‘सीईओ’ आणि युवतीच्या भावासह चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानागो बिंदा दलाई (रा. चेहेडी पंपिंग रोड, नाशिक रोड), कपिल निगळ, रोशन शिंदे आणि राहुल लभडे (तिघे रा. सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

नाशिक पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई निरभवणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी घर सोडून निघून गेल्याने निरभवणे यांनी तिचा शोध घेतला. त्या दरम्यान संबंधित कंपनीचा ‘सीईओ’ मानागो दलाई याच्या घरी पत्नी आढळली. त्यावेळी दलाई याने पोलिस अंमलदार निरभवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत हुसकावून दिले आणि धमकी दिली.

Nashik Crime
Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये व्यस्त; तिकडे होमग्राउंडवर भाजपचे दोन गट, नेत्याला खबरच नाही!

दरम्यान, १८ ऑगस्ट २०२५ ला संशयित कपिल निगळ व रोशन शिंदे यांनी पोलिस अंमलदारास त्र्यंबक रोडवरील कृषी केंद्राजवळ बोलावून ‘तू आरक्षणावर पोलिस झालास, आमच्यासमोर तुझी लायकी नाही’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अंगावर थुंकून अपमान केला व ठार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आंतरजातीय विवाहासंबधीचे पुरावे आणि कागदपत्रे जाळून नष्ट करण्यास नकार दिल्याने संशयितांनी कट रचून आपल्याविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप फिर्यादीत पोलिस अंमलदाराने केला आहे. या याप्रकरणात फिर्यादी अंमलदार निरभवणे यांना ४० दिवस कोठडीत राहावे लागले व खात्यातून निलंबितही व्हावे लागले. निरभवणे हे कोठडीत असताना ‘सीईओ’ मानागो दलाई याने त्यांना ठार करण्यासाठी मारेकऱ्यांना ५० लाख रुपयांची सुपारी व शस्त्र खरेदीसाठी पैसे दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Nashik Crime
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर बँकेत विखे-थोरातांची बाजी; राम शिंदे, नीलेश लंके यांच्यासमोर आव्हान!

​निरभवणे हे जामिनावर बाहेर आल्यावर १७ जुलै २०२६ ला सातपूर कॉलनी परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून ‘दलाईचा नाद सोड, नाही तर जीवाने जाशील’ अशी धमकी दिली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com