Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: भुजबळ का म्हणाले, "२३ तारखेला होणार मोठा धमाका"

Chhagan Bhujbal leaders Diwali Celebrations: मंत्री छगन भुजबळ म्हणाले, यंदा निवडणुकीमुळे नेते घरात दिवाळी साजरी करणार नाहीत

Sampat Devgire

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले यंदा २३ तारखेला मोठा धमाका होणार आहे. महायुतीच दिवाळी साजरी करणार.

यंदाची विधानसभा निवडणूक ऐन दिवाळीच्या कालावधीतच प्रारंभ होत आहे. त्यामुळे सर्वच नेते प्रचाराच्या धामधुमीत आहेत. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे राजकीय विधान केले आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यंदाची दिवाळी राजकीय नेत्यांना आपल्या घरात साजरी करता येणार नाही. बहुतांशी नेते घराबाहेरच दिवाळी साजरी करतील, अशी स्थिती आहे. निवडणुकीच्या हंगामात पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते प्रचारात व्यस्त असल्याने अशी स्थिती सर्वच भागात राहील.

मी स्वतः दिवाळीच्या कालावधीत पाच दिवस कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करत असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सुद्धा दिवाळीत सर्व कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करण्याची पद्धत आहे. त्यांचे कुटुंब मोठे आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा परिवार मोठा आहे. दिवाळीला सर्वांनी एकत्र यायचे, ही त्यांच्याकडे परंपरा आहे. असंख्य कार्यकर्ते नेते देखील यावेळी बारामतीत श्री. पवार यांची भेट घेत असतात. मात्र यंदाच्या दिवाळीत आपण पाहिले तर त्यात मिठाचे खडे पडले आहेत, असे सूचक वक्तव्य देखील भुजबळ यांनी केले.

यंदा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तरीही चार दिवस मी कुटुंबासोबत घरीच राहणार आहे. लोकांना भेटणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा देखील देणार आहे. दिवाळीला आता मतदारांना भेटण्यावर भर द्यावा लागेल. त्यातच व्यस्त रहावे लागेल, असे ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत आपण अतिशय आत्मविश्वासाने मतदारांना सामोरे जात आहोत. येवला मतदार संघाचा गेली पन्नास वर्षे प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. येवल्यातील घराघरात पाणी पोहोचले आहे. त्या घरांमधील नागरिकांचा आनंद सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा आहे. त्यांचा आनंद म्हणजेच आमचा आनंद आहे.

ते म्हणाले, यंदाची खरी दिवाळी २३ नोव्हेंबरला असेल. ती देखील जे जिंकून येतील, त्यांची दिवाळी असेल. यंदाच्या निवडणुकीत आणि दिवाळीत महायुतीच फटाके फोडणार. २३ नोव्हेंबरला राज्यात मोठा धमाका होणार, असे सूचक विधान त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यंदाच्या दिवाळी अनेक घडामोडी घडणार आहेत. निवडणुकीत अर्ज माघारीच्या नंतर प्रचाराला वेग येईल. ५ नोव्हेंबर नंतर देशभरातील अनेक नेते महाराष्ट्रात फिरणार आहेत.

राज्यात सहा पक्षांचे सहा नेते आणि दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांसह विविध नेते निवडणुकीत प्रचारासाठी येतील. ते आपल्या भाषणात प्रचंड फटाके फोडतील. राजकीय आरोप प्रत्यारोपांनी यंदाची दिवाळी विशेष चर्चेत राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT