Nashik News : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरु आहे. सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले तरी नाशिकला अद्याप पालकमंत्री नाही. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांचा पालकमंत्री पदासाठी दावा आहे. अशात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदावरुन नवा दावा केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ज्यावेळेला नाशिकमध्ये दादा भुसे पालकमंत्री झाले होते त्यावेळेला मला धुळे जिल्ह्यात पालकमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यावेळी मी स्पष्ट नकार दिला. मी म्हटलं धुळे वैगेरे काही नको. राहिलो तर नाशिकमध्ये राहील, नाही तर मला पालकमंत्रीपद पाहिजेस असं नाही असं मी सांगितलं होतं असा नव्याने गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.
दरम्यान गोंदियाला ध्वजारोहणासाठी न जाण्याचे कारणही भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, मी नाराज नाही, मी नाशिकला 1991 पासून ध्वजारोहण करत आलो आहे. आता मुद्दा इतकाच आहे की, गोदिंया फार दूर-लांब पडतं. त्यात माझी तब्येतही एवढा प्रवास करण्यासारखी नाही. कारण त्यात दोन-तीन दिवस जाणार. त्यासाठी आधी नागपूरला जावे लागेल. त्यात विमान नसते. तिथूनही पुढे प्रवास... मला ते जमणार नव्हते. म्हणून मी सांगितलं की दुसरं कुणाला तरी पाठवा असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं.
दरम्यान राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुठला मंत्री कुठे ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे नाव जाहीर झाले होते. त्यानंतर त्यावरुन भुजबळ नाराज असल्याचं बोललं गेलं. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असताना, गोदिंयाला ध्वजारोहण करण्यासाठी का जायचं असा सवाल भुजबळांनी केला होता. तब्येतीचे कारण देत त्यांनी गोदिंयाला जाण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोंदियाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवली.
त्यानुसार भुजबळांनी 15 ऑगस्ट रोजी गोदिंयाला न जाता नाशिकमधील मुंबई नाका परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर ध्वजारोहण करण्याचं ठरलं. त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहाता पालकमंत्रीपदावरुन नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. नाशिकमध्ये चार-चार मंत्री असताना दुसऱ्या जिल्ह्याचा नेता येऊन ध्वजारोहण करुन जातो, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.