Shivsena UBT Politics: महायुतीचे अनेक मंत्री वादग्रस्त, मात्र शिंदे गटाचे मंत्रीच वादात का सापडतात?

Varun Sardesai; Sardesai questions, How do the actions of only the MLAs of the Shiv Sena Shinde faction come out?-युवा सेना नेते वरून सरदेसाई म्हणतात, शिवसेना शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे
Varun-Sardesai
Varun-SardesaiSarkarnama
Published on
Updated on

Varun Sardesai News: महायुती सरकारला युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. या सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप असूनही सरकार त्यांना संरक्षण देत आहे. याबाबत शिवसेना जनतेत जाऊन सरकारचे बिंग फोडणार आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक असलेले आयुक्त अनिल पवार हे ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. पवार यांना ईडीने अटक केल्याने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना त्यावर आपली भूमिका मांडणे अपेक्षित आहे. मात्र ते यावर गप्प आहेत. यामध्ये काय दडले आहे हे जनतेला माहित आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यंदा मनसे सोबत युती करणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार त्याने महायुती सरकारच्या पोटात गोळा आल्यासारखे स्थिती झाली आहे.

Varun-Sardesai
Tribal Birhad Morcha: बिऱ्हाड मोर्चाची व्याप्ती वाढणार, उद्यापासून आंदोलनात उतरण्याची आदिवासी संघटनांची घोषणा!

महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती शिवसेना शिंदे पक्षाच्या मंत्र्यांचे बेडरूम मधील व्हिडिओ प्रसारित होतात. त्यांना खोटे खुलासे करावे लागतात. जनतेला सर्व समजत आहे.

भ्रष्ट मंत्र्यांमुळे या सरकार वरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे, असा दावा वरून सरदेसाई त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्याला सुरज चव्हाण यांनी मारहाण केली. चव्हाण यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्याला पदोन्नती देण्यात आली आहे. या द्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष काय संदेश देऊ इच्छितो. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या विरोधात बोलाल तर तुमचे काय हाल होतील असा संदेश तर त्यांना द्यायचा नाही ना?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सुरज चव्हाण हे प्रकरण म्हणजे तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो असे आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन झाले होते. तरीही आंदोलन करताना मारहाण करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष धास्तावलेला आहे की आंदोलनांना घाबरतो आहे हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

------DE

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com