Chhagan bhujbal sameer Bhujbal  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : येवला एक्सप्लोरिंग नावाचं खातं, भुजबळ काका-पुतण्याचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, नेमकं प्रकरण काय?

Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal morphed photos controversy: मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयिताने अकाउंट डिलीट केले.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal morphed photos controversy : सोशल मीडियावरुन मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताने भुजबळांनी प्रतिमा मलिन करण्यासाठी फोटो वापरुन त्यात छेडछाड केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सोशल मीडिया अकाउंटधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे वैयक्तिक फोटो डिजिटल पद्धतीने मॉर्फ करुन, ते आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर लिहून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी नाशिकच्या सिडको येथील हर्षल श्रीधर खैरनार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खैरनार हे नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामचा वापर करत होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या फोटोची छेडछाड करुन ते पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. या फोटोच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून छगन भुजबळ यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

खैरनार हे दैनंदिन वापरासाठी सोशल मिडिया हाताळत असताना त्यांना येवला एक्सप्लोरिंग नावाचे एक अकाऊंट दिसून आले. या खात्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबधित खात्यामागील व्यक्तीचा शोध सुरु आहे.

संबधित पोस्टमध्ये छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचे एकत्रित फोटो मॉर्फ करण्यात आले होते. अज्ञात संशयिताने इन्स्टाग्रामवर बोगस खाते तयार केले. त्यानंतर दोघांचे फोटो मोर्फ करून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून कारवाईसाठी हालचाली सुरू झाली आहे. पोलीस संशयिताकडे पोहोचण्याआधीच त्याने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचे समजते. त्याने अकाऊंट डिलीट केले तरी, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT