Chhagan Bhujbal : आमदार सुहास कांदेंना येवल्यातून लढण्याची इच्छा, भुजबळांनी एकाच शब्दात विषय संपवला

Suhas Kande challenges Chhagan Bhujbal in Yeola : आमदार सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं.
Suhas Kande, Chhagan Bhujbal
Suhas Kande, Chhagan BhujbalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhagan Bhujbal On Suhas Kande Challenges : नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक असून, त्यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी येवल्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी वरीष्ठांची परवानगी मिळाल्यास येवला मतदारसंघातून मंत्री भुजबळांविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत सोशल मीडियावर थेट आव्हान दिले. त्यावर छगन भुजबळ यांनी अवघ्या 'स्वागत आहे' एवढ्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. या मोजक्या प्रत्युत्तरामुळे कांदे-भुजबळ यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानाचा सामना पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.

दिवाळीच्या काळात आमदार सुहास कांदे यांनी येवला मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फलक लावून नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यातून कांदे येवल्याची चाचपणी करत असल्याच्या चर्चा रंगल्या.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी मिळाल्यास छगन भुजबळ यांच्याविरोधात येवल्यातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले. कांदे यांच्या या विधानाची राजकीय चर्चा सुरू असतानाच रविवारी (दि. २२) येवला दौऱ्यावर असलेल्या मंत्री भुजबळ यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ यांनी 'स्वागत आहे' असे म्हणत कांदे यांच्या आव्हानाला थेट प्रत्युत्तर दिले.

Suhas Kande, Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या; घटनास्थळी खळबळ, नेमकं काय घडलं?

महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना छगन भुजबळ यांनी अशा शक्यता नाकारल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे वरिष्ठ नेते सरकार स्थिर आणि मजबूत ठेवण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यामुळे छोट्या- मोठ्या मुद्द्यांवरून सरकारमध्ये मतभेद निर्माण होतील अथवा अडचणी वाढतील, असे वाटत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Suhas Kande, Chhagan Bhujbal
Yeola Political News : छगन भुजबळांच्या येवल्यात आमदार सुहास कांदेंची एण्ट्री, कुणाल दराडेंचा पत्ता कट होणार?

आंबेडकरांच्या विधानावर नाराजी

आनंदराज आंबेडकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. आनंदराज आंबेडकर हे सुशिक्षित आहेत. अजितदादा अतिशय दुर्दैवी अपघातात गेले आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलणे योग्य वाटत नाही. त्यांचे हे विधान आवडलेले नसल्याचे भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.