Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : दमानियांचा दावा भुजबळांनी काढला निकाली; म्हणाले, भाजपचं कोणतंही प्रपोजल माझ्याकडे नाही

Political News: आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच असल्याचे ठणकावून भुजबळांनी सांगितले.

Arvind Jadhav

Nashik News: अंजली दमानिया यांनी माझ्या भाजप प्रवेशाचा दावा कशाच्या आधारे केला हे मला माहीत नाही. नवीन काही बनण्याची माझी अपेक्षा नाही. माझ्याकडे असे कोणतेही प्रपोजल नाही, असे स्पष्ट करीत मंत्री छगन भुजबळ यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच असल्याचे ठणकावून सांगितले. पक्षात घुसमट होत नसून, अजित पवार आपल्या पाठीशी उभे असल्याचा संदेश सुद्धा भुजबळ यांनी या निमित्ताने दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मंत्री भुजबळ आणि सरकार यांच्यात काही मतभेद असल्याच्या बातम्या सातत्याने पुढे आल्यात. त्यातच ओबीसी हक्कांसाठी आपण कोणाचेही ऐकणार नाहीत, अशी भूमीका घेत भुजबळांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले.

यावरून भुजबळ यांना भाजपकडून मदत होत असल्याची आणि लवकरच ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रात्री एक एक्सवर ट्विट केले. त्यात त्यांनी भुजबळ भाजपात जातील आणि ओबीसी चेहरा म्हणून पुढे येतील, असा दावा केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

याबाबत भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही माझ्यासाठीच एक न्यूज आहे. मला याची काहीच माहिती नाही. अंजली दमानिया यांनी माझ्या भाजप प्रवेशाचा दावा कशाचा आधारे केला मला माहिती नाही. मुळात आता मला पदाची हौस नाही. ओबीसी समाजासाठी ३५ वर्षांपासून लढा देतो आहे. देशाच्या विविध भागात मोठ मोठ्या रॅलीज काढल्यात. समाजासाठी लढा सुरूच राहिल. मात्र, नवीन काही बनण्याची आता मला अपेक्षा नाही. भाजपच असा कोणतही प्रपोजल माझ्याकडे नाही. मी राष्ट्रवादीतच राहिल असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात घुसमट नाही : भुजबळ

आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असून, आपली पक्षात कोणत्याही प्रकारची घुसमट होत नाही. मी मंत्रीमंडळात मंत्री असून, पक्षाकडून कोणतीही अडचण नाही. एवढेच नव्हे तर ओबीसी समाजाबाबत काम करण्याचा भुजबळ यांना हक्क असल्याचे पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. पक्षात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करीत पक्ष आपल्या पाठीशी असल्याचा संदेश भुजबळ यांनी यानिमित्ताने दिला.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT