मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद उफाळला आहे. भूजबळाच्या विरोधात कांदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भूजबळाच्या विरोधात कांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी छगन भूजबळ यांना सल्ला दिला आहे. राऊत आज माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ''छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. ते नाशिकचे पालकमंत्री असून महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे (suhas kande) यांना सांभाळून घ्यावं, ते ही समीर आणि पंकज यांच्या सारखे आहेत. कोणाला अहंकार नसावा.''
राज्यातील चित्रपटगृहाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत राऊत म्हणाले की, राज्यातील सिनेमागृह सुरू करण्याबाबत सिनेमागृह चालक- मालक संघटनेसोबत चर्चा झाली. मुंबई हे नाट्यभूमी, सिनेमागृहाच जनक आहे. सिनेमागृह उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि हळूहळू सिनेमागृह सुरू करू दोन वर्षाच सिनेमागृहांची स्थिती खराब झाली आहे. लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे.
सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं होतं. मात्र नळावरच्या भांडणाप्रमाणे दोघांची बाचाबाची सुरु होती. भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हा दौरा वादळी ठरला.
छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.