Chhagan Bhujbal On Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao kokate News: छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कृषिमंत्री कोकाटेंनी मारली पलटी; आता म्हणतात...

Manikrao Kokate On Bhujbal : राजकारणात प्रतीक्षा करावीच लागते. तशी यंदा काहीकाळ भुजबळ यांना प्रतीक्षा करावी लागली. त्याचा त्यांना फायदाच झाला आहे, असेही कोकाटे म्हणाले.

Sampat Devgire

Nashik News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे राजकीय सत्य सर्वश्रुत आहे. कोकाटे यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यावर भुजबळ यांना चांगलेच सुनावले होते. त्यामुळे नव्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही मंत्री कसे जुळवून घेणार याचे उत्तरही लगेचच त्यांनी दिले आहे.

यंदा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे भुजबळ चांगलेच नाराज होते. हे नाराजी त्यांनी विविध प्रकारे व्यक्त देखील केली होती. यातूनच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि भुजबळ यांच्यात जुंपली होती.

नव्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. धनंजय मुंडे यांच्या रिक्तपदी मंगळवारी(ता.20) भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुजबळ समर्थकांत जल्लोष होता. येवला मतदारसंघात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. त्यामुळे कोकाटे यांची प्रतिक्रिया काय असेल याची मोठी उत्सुकता होती. त्यावर आज त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांच्याविषयी आपल्या मूळ भूमिकेशी आज त्यांनी चक्क यू-टर्न घेत फारकत घेतल्याचे दिसून आले. भुजबळ मंत्री झाल्याने मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्याचा पक्षाला निश्चितच मोठा फायदा होईल, या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्री करण्याचा निर्णय घेतला. विचारपूर्वकच निर्णय घेतला असावा. मी याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पाहतो. भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य वाटले असावे, म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांनी हा निर्णय घेतला असावा.

मी भुजबळ यांच्याविषयी काहीही विधान किंवा टीका केलेली नाही. दीर्घकाळ मी प्रतीक्षा केली आहे. राजकारणात प्रतीक्षा करावीच लागते. तशी यंदा काहीकाळ भुजबळ यांना प्रतीक्षा करावी लागली. त्याचा त्यांना फायदाच झाला आहे, असे कोकाटे म्हणाले.

कृषिमंत्री कोकाटे भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याची अनेकांना उत्सुकता होती. मंत्री कोकाटे यांनीही फार वेळ प्रतीक्षा करावी लावली नाही. त्यांनी भुजबळ यांचे स्वागत आणि स्तुती करत सगळ्यांनाच शॉकिंग ठरेल अशी बातमी दिली आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून डावल्यानंतर अजित पवारांवर टीका केलेल्या छगन भुजबळांना लक्ष्य केलं होतं. छगन भुजबळ यांच्यासाठी केवळ त्यांचा मुलगा आणि पुतण्या एवढेच ओबीसी आहेत. अन्य कोणी त्यांना ओबीसी दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती.

तसेच राज्य मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी 17 ओबीसी, तर 16 मराठा मंत्री आहेत. ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला नाही. जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही. भुजबळ यांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाने कोणतीही चूक केली नसून, भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे म्हणून आपण मध्यस्थी करणार नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला, तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नसल्याचंही कोकाटे म्हणाले होते.

भुजबळांना काय वाटते, त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल, त्यांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असतील; दुसरे ओबीसी दिसत नसतील, तर त्याला काय करणार, असा खोचक टोलाही मंत्री कोकाटे यांनी लगावला त्यावेळी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT