Chhagan Bhujbal News: भुजबळांची 'एन्ट्री' अन् मुंडेंना 'दे धक्का'; फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'ची वाट खडतर; 'ही' आहेत कारणं

Chhagan Bhujbal Minister Post Oath : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेरच्या क्षणी छगन भुजबळांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवत धनंजय मुंडेंच्या पारड्यात मंत्रिपद टाकलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यावेळी भुजबळांचंच खातं मुंडेंना दिलं.
Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Dhananjay Munde, Chhagan Bhujbal, Ajit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज बांधणे महाकठीण झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत असून याचा प्रत्यय वारंवार अनेकदा येत असतो. आताही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात छगन भुजबळांच्या अचानक एन्ट्रीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण भुजबळांसारखा मातब्बर नेता महायुतीच्या मंत्रिमंडळात दाखल झाल्यानं फडणवीस सरकारची ताकद वाढली आहे, पण दुसरीकडे धनंजय मुंडेंचं (Dhananjay Munde) मंत्रिमंडळातलं कमबॅक पुढची पाच वर्षांसाठी खडतर झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरच्या निकालात महायुतीच्या मंत्रिमंडळातून अचानक काही वजनदार आणि अपेक्षित नेत्यांना डावलण्यात आले होते.त्यात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचाही समावेश होता. या दोन्ही नेत्यांनी मंत्रि‍पदासाठी पत्ता कट झाल्यावर प्रचंड आदळआपट केली होती. भुजबळांनी तर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांवरच टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांनी सातत्यानं आपली नाराजीही बोलून दाखवली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेरच्या क्षणी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मंत्रि‍पदापासून दूर ठेवत धनंजय मुंडेंच्या पारड्यात मंत्रिपद टाकलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यावेळी भुजबळांचंच खातं मुंडेंना दिलं. त्यामुळे भुजबळ आणि मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये अजितदादांनी त्यावेळी अनुभवी आणि बुलंद तोफ असलेल्या भुजबळांऐवजी तरुण तडफदार आक्रमक बाणा असलेल्या धनंजय मुंडेंना झुकतं माप दिल्याचं बोललं गेलं.

महत्त्वाची बाब म्हणजे जे अन्न व नागरी पुरवठा भुजबळांकडे होतं तेच मुंडेंना देण्यात आलं. पण बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंही विरोधकांच्या निशाण्यावर आले. यात आधी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला मुकावे लागलेल्या धनंजय मुंडेंना अखेर 84 दिवसानंतर मंत्रिपदावरुनही राजीनामा देत पायउतार व्हावे लागले.पण भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनं धनंजय मुंडेंचे पुढील पाच वर्ष मंत्रिमंडळातील कमबॅक शक्य होणार नसल्याचे चिन्हे आहेत.

Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा; ‘मी जबाबदारीने सांगतोय...धनंजय मुंडेही काही दिवसांतच मंत्रिमंडळात दिसतील’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला पार पडला होता.नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.यावेळी भाजपाच्या एकूण 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांसह शिवसेनेच्या अब्दुल सत्तार,दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता.

पण आता छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात पुन्हा एकदा अचानक कमबॅक झाल्यानं सध्यातरी राष्ट्रवादीतून नवीन नेत्यास पुन्हा नव्यानं मंत्रिपदाची संधी मिळणं तसं कठीण असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात इनकमिंगचा आशा सध्या तरी संपुष्टात आल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Rahul Gandhi News : राहुल गांधी हे आधुनिक युगातील मीर जाफर..! भाजपकडून वादग्रस्त फोटो शेअर अन् हल्लाबोल...

धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणासह करुणा शर्मा-मुंडे प्रकरणही भोवल्याची चर्चा आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील माझगाव कोर्टातील खटला जिंकला आहे.आता त्यांनी धनंजय मुंडेंवर 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार केली आहे. या प्रकरणात त्यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी घालवणारच असल्याचा धोका आहे. हेही एक महत्त्वाचं कारण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा दारं बंद करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

तसेच संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंविरोधात काहीसं रोषाचं वातावरण आहे. तिथे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची धग अजूनही कायम आहे.याचवेळी भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंवर देशमुख हत्येप्रकरणासह त्यांच्या कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळातील घोटाळ्यांवरुनही गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : जरांगे विरुद्ध भुजबळ वाद पुन्हा पेटणार? अडचणीतील मुद्द्यांवर महायुतीने शोधला 'जालीम' उपाय

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडेंना टार्गेट केलं आहे. या सगळ्या वादाच्या किनार मुंडेंना राजकीय दृष्ट्या प्रचंड बॅकफूटला घेऊन गेल्यानं त्यांचं मंत्रिमंडळातील कमबॅक सध्यातरी अशक्यप्रायच असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com