Chhagan Bhujbal in Yeola News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

...जेव्हा छगन भुजबळ येवल्याच्या गल्लीबोळात फेरफटका मारतात!

येवला शहरातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली.

Sampat Devgire

येवला : शहरातील (Yeola) रस्ते, भूमिगत गटारीसह विविध प्रकारची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांची स्वतः शहरात फिरून पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पाहणी केली. विविध सूचना करत ही कामे तातडीने पूर्ण करा, कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही अशा सूचना भुजबळांनी संबंधितांना दिल्या. (Chhagan Bhujbal in Yeola News)

श्री. भुजबळ यांनी संपर्क कार्यालयात शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. भुजबळ यांनी शहारातील सांडपाणी, भूमिगत गटार, सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली.

शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येणार नाही याची दखल घ्यावी. रखडलेली अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

शहरातील मुख्य नाल्याची माहिती घेऊन स्वच्छतेची काळजी घ्यावी असे त्यांनी सूचना दिल्या. मुख्याधिकारी संगिता नांदूरकर यांनी विविध कामासह उपक्रमांची माहिती यादरम्यान भुजबळाना दिली. विकास कामाप्रश्नी झालेल्या बैठकीला ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, कृषी सभापती संजय बनकर, बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण बनकर तसेच प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि. बी. पाटील, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता जनार्धन फुलारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT