पवारांचा मित्र असल्याचे सांगत गुन्ह्यांचा चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव

राजकीय दबाव आणल्याबद्दल मर्चंटविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र,अद्याप त्याला अटक झालेली नाही.
Parth Pawar
Parth Pawarsarkarnam
Published on
Updated on

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांचे मित्र असल्याचे सांगत गुन्ह्याचा चुकीचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांवर दबाव आणण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच घडला.

पार्थ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर नेते व पदाधिकाऱ्यांच्याही नावाचा गैरवापर करण्याचा अश्रफ मर्चंट या व्यक्तीचा प्रयत्न हिंजवडी पोलिसांनी झुगारून लावला. एवढेच नाही, खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा म्हणून राजकीय दबाव आणल्याबद्दल मर्चंटविरुद्ध सोमवारी (ता.२८) गुन्हा दाखल केला. मात्र,अद्याप त्याला अटक झालेली नाही.

अमित देवराम कलाटे याच्याविरोधात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावटगिरीच्या तीन गुन्ह्यात खोटी साक्ष घेऊन चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी हा दबाव या गुन्ह्यांचे तपासाधिकारी तथा हिंजवडी पोलिस ठाण्यातील एपीआय नकुल न्यामणे यांच्यावर टाकण्यात आला होता. २२ जानेवारीला सकाळी त्यासाठी त्यांना मर्चंटने फोन केला. पार्थभाऊंचा मित्र असल्याचे त्याने सांगितले.

Parth Pawar
दहा राज्यांमधील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

``तुमच्याकडे अमित कलाटेंचा विषय आहे. त्यात तुमचा काय स्टॅंड आहे? मी आणि पार्थ पवारांचे पीए सागर जगताप असे अमित कलाटेचे खास मित्र आहोत. तुम्हाला सांगतोय, ते ऐका. नाहीतर, तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसलेनगर येथे डायरेक्ट समोर घेऊन जाईन. अमित कलाटेचा काय असेल, तो विषय मिटवून घ्या, नाही, तर वरपर्यंत तो घेऊन घ्यावा लागेल``, असे मर्चंटने फोनवरून न्यामणे यांना धमकावले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेष पाटील यांनी, पण मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे, असे बोलून मर्चंटने एपीआय न्यामणेंवर आणखी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्यामणे हे रजेवर होते. ते काल पुन्हा कामावर रुजू झाले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या कानावर हा प्रकार घातला.

Parth Pawar
'मातोश्री'ला वाचविण्यासाठी जाधवांनी स्वतःच्या आईचे नाव द्यावे?..वाईट वाटतं!

रेकॉर्डेड संभाषण त्यांना ऐकवले. त्यानंतर राजकीय पक्षांच्या मोठ्या पदांवरील व्यक्तींच्या नावे खोटा फोन करून दबाव आणल्याबद्दल मर्चंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय सागर काटे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपी मर्चंटला अटक केल्यानंतरच त्याचे व कलाटेचे काय सबंध आहेत, त्याला कोणी हा फोन करायला लावला, तो खरंच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मित्र आहे का, असा या प्रकरणाचा सगळा उलगडा होणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com