Nashik Politics  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray Group News : अजित पवार गटाला धक्का; महिला नेत्यांच्या हाती शिवसेनेची मशाल

Setback to Chhagan Bhujbal in Yeola Constituency Uddhav Thackeray Shiv Sena : छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील शंभराहून अधिक महिला नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला....

Sampat Devgire

Thackeray Group Shiv Sena Nashik News :

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. प्रमुख महिला नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना Uddhav Thackeray गटात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

एक एक नेता मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रयत्न होत आहेत. विशेषत: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः धडपड करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आज येवला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. शंभराहून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडण्यात उद्धव ठाकरे गटाला यश आले.

येवला-लासलगाव मतदारसंघातील निफाड तालुक्यातील 46 गावांतील या महिला पदाधिकारी आहेत. यामध्ये निफाड तालुका उपाध्यक्ष सौ मनीषा रत्नाकर वाघ, लासलगाव शहर प्रमुख सौ सुनीता बोडके, वनिता निरभवणे, पारूबाई लाटे, आशा पवार, वैशाली पवार, शीलाताई वाघ, ज्योती आहेर यांसह 100 महिला पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे झालेल्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, राजाभाऊ दरेकर, नाना जेऊघाले या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या महिलांना शिवबंधन बांधण्यात आले. या प्रवेशाची कुणकुण लागल्याने अजित पवार गटाच्या एका मंत्र्याने या महिलांना स्वतः फोन करून प्रवेश थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या महिला आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात पक्षाला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली अशी चर्चा आहे.

या संदर्भात संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी आगामी काळात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा येवला विधानसभा मतदारसंघात अधिक विस्तार होणार आहे, असा दावा केला. राज्यातील सत्ताधारी पक्ष राजकीय पक्षांच्या नेते आमदार, खासदार यांना तपास यंत्रणांची भीती दाखवून पक्ष फोडत आहेत. शिवसेना हा महाराष्ट्राचा श्वास आहे. मराठी माणसांचा हा पक्ष भाजपने फोडून महाराष्ट्राचा अवमान केला आहे. जे लोक आज या भाजपला पाठिंबा देतात, त्यांना आगामी काळात जनता आणि शिवसेना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT