nashik loksabha constituency
nashik loksabha constituency sarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही नाशिक काँग्रेसमध्ये शांतता!

Nashik Congress News : नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्वी काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र...
Published on

शहरातील सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) तयारी करीत आहेत. विशेषतः उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aghadi ) घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये ( Congress ) अक्षरशः शांतता आहे.

nashik loksabha constituency
Lok Sabha Election 2024 : विखे पाटलांनी वाढवलं खासदार हेमंत गोडसेंचं टेन्शन; नाशिकबाबत केलं मोठं विधान

आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडी आणि महायुती, असा सरळ 'सामना' अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मालेगावबाह्य या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असतो. मालेगाव शहर आणि धुळे येथे देखील महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला उमेदवारी मिळते. अशा स्थितीत आघाडीचा घटक पक्ष म्हणून अन्य पक्ष निवडणुकीसाठी व्यस्त असताना काँग्रेसचे कार्यालय आणि यंत्रणेत अक्षरशः निरुत्साहाचे वातावरण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीतर्फे नाशिक मतदारसंघातून विविध इच्छुक अतिशय जोमाने काम करीत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हे तिन्ही गट नाशिक मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांचे विविध कार्यक्रम मिळावे आणि बूथस्तरीय यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.

nashik loksabha constituency
Leadership of Sharad Pawar : राष्ट्रवादी म्हणते, भुजबळ नव्हे तर शरद पवारांनाच नाशिक आपला नेता मानते..!

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या मतदासंघात यापूर्वी उमेदवार दिले आहेत. यंदा शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाने नाशिक मतदारसंघात अतिशय जोरदार तयारी केली आहे. या पक्षाकडे विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांसह विविध इच्छुक स्पर्धेत आहेत. त्यादृष्टीने सहकारी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे फारशी मदत होईल, अशी अपेक्षाही या पक्षांनी केलेली नाही. काँग्रेसमध्ये निवडणुकीसंदर्भात कोणत्याही हालचाली नाहीत. सध्या तर निवडणुकीच्या विषयावर या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकही होत नसल्याने काँग्रेसपुढे आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना ही पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता अस्वस्थ करीत असल्याचे दिसते.

nashik loksabha constituency
Nashik BJP : भाजप निवडणूक तयारीच्या बैठकीकडे बूथप्रमुखांनीच फिरवली पाठ; नाशिकमध्ये नेमकं काय झालं?

नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्वी काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, काँग्रेसमध्ये विभागणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसने लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेस नेते गोपाळराव गुळवे यांनी उमेदवारी केली होती. मतविभागणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माधवराव पाटील आणि गुळवे यांच्यातील मतविभागणीचा लाभ शिवसेनेचे उत्तमराव ढिकले यांना मिळाला होता. त्यात शिवसेनेचे ढिकले विजयी झाले. त्यानंतर कोणत्याही लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नव्हता.

( Edited By : Akshay Sabale )

nashik loksabha constituency
BJP Nasik Politics: भाजप आजमावणार ताकद, ३३ वर्षानंतर देणार नाशिकमध्ये उमेदवार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com