Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अमृत महोत्सवानिमित्त होणार `छगन भुजबळ व्याख्यानमाला`

Sampat Devgire

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अमृतमहोत्सवी (On 75th birthday seies of lecture) वाढदिवसानिमित्त ‘भुजबळ एक संघर्ष योद्धा‘ व्याख्यानमाला होणार आहे. यानिमित्त येत्या १५ ऑक्टोबरपासून (From 15th of october) वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतील.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी ही माहिती दिली.

श्री. खैरे म्हणाले, की ओबीसींचे नेते श्री. भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात रक्तदान, रोगनिदान, महिलांसाठी आरोग्य, मुक्या पाळीव जनावरांचे रोगनिदान, नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिरे होतील. ज्येष्ठांचे मेळावे घेण्यात येतील. त्याचवेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करत अनाथ मुलांना दत्तक घेण्यात येईल. कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल. श्री. कर्डक म्हणाले, की हा अमृतमहोत्सवी सोहळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धरुन केला जाईल. वर्षभरात ७५ ठिकाणी व्याख्यानमाला होईल. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर, दिलीप तुपे, योगेश कमोद उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार

छगन भुजबळ यांचा १५ ऑक्टोबरला अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय बुधवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब कर्डक, सहकार सेल प्रदेशाध्यक्ष भारद्वाज पगारे, महापालिका गटनेते गजानन शेलार, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, शहराध्यक्ष अंबादास खैरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, शहराध्यक्ष धनंजय निकाळे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, शहर कार्याध्यक्ष इम्रान पठाण यांच्यासह तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

तालुका आणि प्रभागनिहाय अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम होतील. रक्तदान शिबिरे, शाखा उद्‍घाटन, रोगनिदान शिबिर, महिलांसाठी कर्करोग व अन्य रोगनिदान शिबिरे, मुक्या पाळीव जनावरांची रोगनिदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, नोकरीविषयक मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्यवाटप, अनाथ मुलांना दत्तक घेणे, संघर्षयोद्धा व्याख्यानमाला, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, रेशनकार्ड शिबिरे, नेत्र व मधुमेह तपासणी शिबिरे, मिठाई-फळवाटप आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश असेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT