Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics : '...म्हणून नाशिकच्या दोन्ही जागा महायुती जिंकणार' ; छगन भुजबळांचा दावा!

Mayur Ratnaparkhe, Sampat Devgire

Nashik constituency 2024: पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी होत आहे. यामध्ये नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि नेते मतदानासाठी प्रयत्न करीत आहेत.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की, महायुतीने अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार केला आहे. महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये चांगला समन्वय होता. त्यामुळे मतदारांपर्यंत नेमका संदेश देण्यात आमची युती यशस्वी झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले, नाशिक जिल्ह्यात अडीच मतदार संघ आहेत. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ नाशिकचे आहेत. या सर्व जागांवर महायुतीने अतिशय प्रबळ उमेदवार दिले आहेत. त्यांनी उत्तम प्रचार केला आहे. मतदारांकडून त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या फीडबॅक नुसार महायुती या सर्व जागा जिंकेल यामध्ये काहीही शंका नाही.

उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानात महायुतीचा ट्रेंड दिसेल. मतदारांना नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणून हवे आहेत. त्या दृष्टीनेच मतदान करण्याकडे सगळ्यांचा कल दिसतो आहे. फक्त कल नव्हे तर मतदारांनी तशी खून गाठ बांधली आहे. त्यामुळे महायुतीला यंदा मोठे यश मिळेल. याबाबत कोणालाही शंका नाही.

दिंडोरी आणि नाशिक मतदार संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त सभा झाली. पिंपळगाव बसवंत येथे झालेली ही सभा अतिशय मोठी होती. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भर पावसात सभा झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शनिवारी झालेल्या सभेला देखील खूप मोठा प्रतिसाद होता. या सर्व सभा यशस्वी झाल्याने भाजप आणि शिवसेनेला मोठे यश मिळेल यात कोणतीही शंका नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT