Sangli Lok Sabha 2024: सांगलीचा खासदार कोण? पैज लावणं दोघा मित्रांच्या अंगलट; पोलिसांनी उचललं मोठे पाऊल...

Sangli Lok Sabha Election 2024: शिरढोण येथील जाधव यांनी संजय काका पाटील हे निवडून येतील, तर गौस मुलाणी यांनी विशाल पाटील (vishal patil) हे निवडून येतील, अशी पैज लावली होती.
Sangli Lok Sabha 2024: सांगलीचा खासदार कोण? पैज लावणं दोघा मित्रांच्या अंगलट; पोलिसांनी उचललं मोठे पाऊल...

Sangli News, 9 may: लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चहा टपऱ्यांवर, चावडीवर, पारावर खासदार कोण होणार याचीच चर्चा सुरु आहे, अशातच सांगलीचा खासदार कोण होणार, यावर पैज लावणे दोन मित्रांना महागात पडले आहे. ही पैज दोघा मित्रांच्या अंगलट आली आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी, असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. दोघांनी आपल्या बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती. या पैजेसाठी लिहिलेला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता, आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे दोघा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. शिरढोण येथील जाधव यांनी संजय काका पाटील हे निवडून येतील, तर गौस मुलाणी यांनी विशाल पाटील (vishal patil) हे निवडून येतील, अशी पैज लावली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी पोलिसांना या मित्रांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या पैजेचा 'निकाल'लावला आहे.

Sangli Lok Sabha 2024: सांगलीचा खासदार कोण? पैज लावणं दोघा मित्रांच्या अंगलट; पोलिसांनी उचललं मोठे पाऊल...
NDA Vs INDIA: उत्तर प्रदेशात पुन्हा 'NDA'चा शोर की 'INDIA' चा जोर?

2019 मध्ये झालेल्या सांगलीच्या निवडणुकीतही मिरज येथील दोघांनी कोण निवडून येणार याबाबतची पैज लावली होती, त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी एक लाखाची पैज लावली होती. त्यासाठी त्यांनी नोटरीही करुन घेतली होती.

निकालानंतरच्या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही त्यांनी देऊन टाकले होते. मात्र या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरीता पैज लावून शंभरच्या स्टॅम्पवर सह्या केल्या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com