Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: भुजबळांचा रोख कोणावर?, माझ्या हातात असते तर, केव्हाच पालकमंत्री नेमला असता!

Chhagan Bhujbal:United Maharashtra was achieved only due to the courtesy of Indira Gandhi-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मंगल कलश यात्रा नाशिक मध्ये दाखल

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: पालकमंत्रीपदाचा तिढा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुटला अशी आशा निर्माण झाली होती. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. अद्यापही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. तो केव्हा सुटणार? याचे उत्तर अनिश्चित आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मंगल कलश यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदाचे काय? अशी विचारणा केली असता, त्यांनी स्पष्टच सांगितले. हा विषय माझ्या अखत्यारीत असता तर केव्हाच नाशिकचा पालकमंत्री नियुक्त झाला असता, असे उपरोधिक विधान त्यांनी केले.

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुती सरकारमधील तिन्ही घटक पक्षाचे मंत्री देव पाण्यात घालून बसले आहेत. गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. मात्र त्याला झालेल्या प्रखर विरोधामुळे ही नियुक्ती एका दिवसातच स्थगित करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र दिनाचे झेंडावंदन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होत आहे. तीन महिने उलटूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. गिरीश महाजन यांच्या समर्थकांना मात्र गिरीश महाजन हेच पालकमंत्री होतील, असे अद्यापही वाटते आहे. खाजगी आणि सार्वजनिक चर्चेतही भाजपचे कार्यकर्ते उघडपणे महाजन हेच पालकमंत्री होतील, असे बोलतात. शिक्षक मात्र तसे होऊ शकलेले नाही.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार पक्षाचे आहेत. त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष पालकमंत्री पद मिळावे यासाठी अडून बसले आहेत. सरकारच्या घटक पक्षातील हे टोकाचे मतभेद मिटविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत हा वाद गेला होता. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ जवळपास वीस वर्ष राज्य मंत्रिमंडळात सदस्य म्हणून काम करीत आले आहे. मात्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे भुजबळ आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. सर्वाधिक काळ भुजबळ हेच नाशिकचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ‘माझ्या हातात असते तर, केव्हाच पालकमंत्री नियुक्त झाला असता’ या त्यांच्या विधानात त्यांच्या मनातील सल तर व्यक्त झाली नाही ना? अशी चर्चा आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT