Waqf Bill News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वक्फ बिल विरोधी आंदोलन देशभरात स्थगित करण्यात आले होते. या आंदोलनाला कालपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. मालेगाव शहरात त्याची घोषणा करण्यात आली.
केंद्र शासनाने वक्फ बिल दुरूस्ती विधेयक मंजूर केले. या विधेयकातील दुरुस्त्यांना देशभरातील मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्व राजकीय पक्षांनी त्यात भाग घेतला. अपपद ठरला ते एमआयएम आणि त्या पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या अनुपस्थितीचा.
यासंदर्भात मुस्लिम पर्सनल ला बोर्डाचे मौलाना उमरेन यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी जाहीर केली. माजी आमदार आसिफ शेख, समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष मुष्तकीम डिग्निटी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष एजाज बेग आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजेंद्र भोसले उपस्थित होते. या आंदोलनाला सत्ताधारी भाजप व शिवसेना वगळता अन्य सर्वच पक्षांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला.
मालेगाव शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार मौलाना मुफ्ती यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली होती. एमआयएम हा पक्ष अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतो. मात्र वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती मुळे केंद्र सरकार विरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनात अपक्ष मालेगाव शहरातच अलिप्त राहिला. त्यामुळे अन्य पक्षांनाही आमदार मौलाना मुक्ती यांची राजकीय कोंडी करण्याची आयती संदीप मिळाली.
यावेळी मौलाना उमरेन यांनी केंद्र सरकारने राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून हे विधेयक मंजूर केले आहे. गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आगामी बिहार आणि अन्य राज्यांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हिंदू आणि मुस्लिम समाजात ध्रुवीकरण करण्याचे हेतूने त्यांनी हे काम केले आहे. देशातील जनता त्याला योग्य उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.