Sharad Pawar & Chhagan Bhujba Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics: भुजबळ विरोधात कोण वाजवणार तुतारी? शरद पवारांकडे दोन तास चाचपणी!

Chhagan Bhujbal;Who will blow the trumpet against Bhujbal, Sharad Pawar's dumb signal-छगन भुजबळा॑विरोधात इच्छुक उमेदवारांची शरद पवारांनी केली वन टू वन चर्चा

Sampat Devgire

Pawar Vs Bhujbal News: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. या संदर्भात सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध इच्छुकांची दोन तास चर्चा केली.

येवला मतदार संघात मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर अतिशय प्रभावीपणे काम करीत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील संबंधित 48 गावांमध्ये मंत्री भुजबळ यांच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. येथील कार्यकर्ते देखील अतिशय आक्रमक आहेत.

त्यामुळेच या भागातून अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडीच्या या इच्छुकांशी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकत्रितपणे आणि व्यक्तिशः चर्चा केली.

या चर्चेत निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार कोण असेल याबाबत श्री पवार यांनी कोणताही संकेत दिला नाही. सोमवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत श्री भुजबळ यांच्या विषयी राजकीय आणि निवडणुकीतील मतदारांच्या विभागणीची माहिती श्री पवार यांनी विचारली. यावेळी इच्छुकांचा गोंधळ उडाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या बैठकीला येवल्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, संजय बनकर, सोनिया होळकर, शिवसेना ठाकरे गटाचे शिवा सुरासे, कुणाल दराडे, डॉ सुजित गुंजाळ आदी विविध इच्छुक उपस्थित होते.

येवला मतदारसंघाच्या रणनीतीबाबत या इच्छुकांसमवेत शरद पवार यांनी दोन तास चर्चा केली. काही वेळ प्रत्येक इच्छुकाचे मत जाणून घेण्यासाठी वन-टू-वन चर्चा देखील झाली. या बैठकीनंतर श्री पवार यांनी या इच्छुकांना एकत्र रहा आणि आपले ध्येय काय आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी व्यक्तिगत इच्छांना मुरड घाला, असे अप्रत्यक्षरीत्या सुचित केल्याचे कळते.

या मतदारसंघात आगामी निवडणुकीत मंत्री भुजबळ यांच्या विरोधात तुतारी कोण वाजवणार? हा सगळ्यात मोठा उत्सुकतेचा विषय आहे. त्याविषयी कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही. मात्र एकंदरच संबंधित इच्छुकांशी झालेल्या चर्चेत श्री पवार समाधानी होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

येवला मतदार संघाची खरी रणनीती पवार येत्या दोन आठवड्यात घेण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिला जाईल, असे या चर्चेतून पुढे आले आहे.

यामध्ये येवल्यातील काही नेते श्री भुजबळ यांच्या उपकाराखाली आहेत. त्यामुळे किती इच्छुक उघडपणे भुजबळ यांच्याशी संघर्ष करू शकतील, याची चाचपणी श्री पवार यांनी केली. यावेळी संभाजी पवार अंबादास बनकर यांसह काही नेते या बैठकीला गेले नव्हते. या नेत्यांची भूमिका काय? यावरून देखील परस्पर गोंधळ चर्चेत झाल्याचे समजते.

श्री भुजबळ यंदा पाचव्यांदा उमेदवारी करीत आहेत. यंदाची निवडणूक त्यांना आजवरच्या चार निवडणुकांएव्हढी सोपी नसेल. यावेळी त्यांच्याबरोबर असणारे पवार समर्थक नेते उघडपणे त्यांचा प्रचार करू शकतील का? अशी चर्चा आहे. सामाजिक दबावामुळे यातील अनेक लोक भुजबळ यांच्याबरोबर किती मनापासून असतील हा गंभीर विषय आहे.

येवला मतदारसंघात ऐनवेळी वेगळाच डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री भुजबळ देखील सावध असून सध्या त्यांनी भूमिपूजन आणि घोषणांचा सपाटा लावला आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT