Girish Mahajan Politics: भाजपचे 'संकट मोचक' गिरीश महाजन स्वतःच्याच मतदारसंघात संकटात?

Girish Mahajan Politics; Sharad Pawar successful to ploy to surround BJP's trouble shooter?-गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी राष्ट्रवादीच्या गळाला लावण्यात शरद पवार यशस्वी
Deelip Khodpe, Sharad Pawar & Girish Mahajan
Deelip Khodpe, Sharad Pawar & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mahajan Vs Khodpe News : लोकसभेसाठी भाजप अतिशय आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेला. भाजपचा तो आत्मविश्वास विधानसभेत दिसेल का? अशी चर्चा आहे. विविध राजकीय घडामोडींमुळे अडचणीत येणाऱ्या नेत्यांमुळे तशी स्थिती आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. पक्षाचे संकट मोचक असे देखील त्यांना म्हटले जाते. आता हे संकट मोचक स्वतःच्याच मतदार संघात संकटात सापडतात की काय अशी चिन्हे आहेत.

मंत्री महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्या एवढेच त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेल्या पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत. हे आरोप आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांसाठी एक मुद्दा होतात की काय, अशी चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत गटबाजी आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पक्षात दोन गट तयार झाले आहेत. हे नेते स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे पक्षाच्या विषयी कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीचा सन्मान नाही, असा गंभीर आरोप खोडपे यांच्या राजीनामा पत्रात आहे.

Deelip Khodpe, Sharad Pawar & Girish Mahajan
Kiran Lahamate : आमदार लहामटेंची कठोर भूमिका; अजितदादांची महायुतीत झाली कोंडी

मंत्री गिरीश महाजन हे स्वतःच गटबाजीला प्रोत्साहन देतात. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले जाते. काही पदाधिकारी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे अनेक प्रामाणिक लोक भाजपमध्ये बाजूला पडले आहेत, अशीही खोडपे यांची तक्रार आहे.

भाजपा मध्ये कौटुंबिक आपुलकी आणि जिव्हाळा संपुष्टात आला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात अतिशय जवळचा कार्यकर्ता कैलास पालवे अपघातात गंभीर जखमी झाला. तो दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होता. त्यावेळी मंत्री महाजन जल्लोषात नाच-गाणे करण्यात मशगुल होते.

त्या कार्यकर्त्याची कोणी चौकशीही केली नाही. अशी भावनिक खंत देखील खोडपे यांच्या पत्रात आहे. असे विविध आरोप श्री खोडपे यांनी केले आहेत. या परिस्थितीमुळेच आपण 35 वर्ष भाजपमध्ये होतो. मात्र आता कोंडमारा होत आहे.

Deelip Khodpe, Sharad Pawar & Girish Mahajan
Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांना मोठा झटका, भाजप नेते दिलीप खोडपे यांचा राजीनामा!

पक्षात असा कोंडमारा होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्री खोडपे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष याबरोबरच मतदार संघात चांगला संपर्क व प्रतिमा असलेले नेते आहेत.

मंत्री महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. आता श्री खोडपे तुतारी हाती घेणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडताना राजकीय आरोप होणारच. त्यात नवीन काही नाही. मात्र यानिमित्ताने गेली तीस वर्ष जामनेर मतदार संघात आमदार असलेल्या मंत्री महाजन यांना एक प्रबळ विरोधक मिळाला आहे.

या निमित्ताने त्यांना आता गावोगावी जाऊन प्रचार करावा लागेल. यानिमित्ताने महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संकट मोचकाला राजकीय संकटात ढकलले आहे एवढे मात्र नक्की.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com