TCS conversion case Maharashtra : नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात पसार असल्यापासून निदा खान हिच्यावर पोलिसांचं बारकाईनं लक्ष होतं. तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. ती मावशीच्या संपर्कात होती.
अन् तिच्या मावशीच्या संपर्कात होता, 'AIMIM'चा नगरसेवक मतीन पटेल! हे सर्व प्रकरण समोर कसं आणायचं, यासाठी इम्तियाज जलील यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा जबाब नोंदवायचा आहे, असा निरोप देत मतीन पटेल याला पोलिस आयुक्तालयात बोलावून घेत, थेट निदा खान प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली. त्याच्याकडून ठावठिकाणा काढून घेत, नारेगाव परिसरातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी मतीन पटेलभोवती विणलेल्या या जाळ्याची, नीतीची चर्चा होत आहे.
निदा खान 40 दिवसांपासून पसार होती. तिला छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) नारेगाव परिसरातून अटक करण्यात आली. ती नारेगाव परिसरात आई-वडील, मावशी, इतर एक व्यक्ती आणि ती स्वतः, असे पाच जण राहायचे. पाच व्यक्ती कोण? हे मात्र अजून समोर आलेलं नाही.
निदा खान राहत असलेले घर दिवसभर बंद असायचे. सहाजिक निदान खान इथं राहत आहे, हे कुणाला कळू असा त्यामागील हा हेतू होता. काही लागल्यास, तर तिचे वडील बाहेर पडायचे आणि सामान घेऊन परत यायचे. जेवणाची व्यवस्थाही मतीन पटेल याने करून दिली होती.
निदाची मावशी ही मतीन पटेल हिच्या सतत संपर्कात होता. मोबाईलवर दोघांमध्ये सातत्याने बोलणं व्हायचं. या कॉलची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. परंतु, मतीन पटेल हा लोकप्रतिनिधी असल्याने थेट विचारणा कशी करायची, असा प्रश्न होता. त्यामुळे त्याला जुन्या प्रकरणाचा मुद्दा बाहेर काढला.
'AIMIM' माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने मतीन पटेल याला पोलिस आयुक्तालयात बोलवण्यात आले. मतीनल तिथं थेट निदा खानबाबत विचारपूस करण्यात आली. आपला ट्रॅप लागल्याचे मतीनच्या लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निदाचा ठिकाणा सांगितला.
निदा खानच्या नाशिक इथला भावाचा AIMIMमध्ये संपर्क होता. त्याने नाशिक येथील पदाधिकारी असलेल्या मित्रामार्फत मतीन पटेल याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मतीन या प्रकरणात सहभागी झाला. दरम्यान, मतीन निदाच्या मावशीच्या संपर्कात कसा आला, त्याचा आणि तिचा परिचय कसा वाढला, याचा तपास पोलिस करत आहेत.
निदा खान हिला 11 मे रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. परंतु तिला आश्रय देण्यावरून AIMIMचा नगरसेवक मतीन पटेल यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.