Nida Khan TCS AIMIM SIMI Links : ‘सिमीशी संबंध असलेले लोक 'AIMIM'मध्ये?’ निदा खान धर्मांतर प्रकरण, मंत्री विखेंच्या आरोपांनी राजकीय खळबळ

BJP Radhakrishna Vikhe Patil seeks investigation into alleged AIMIM-SIMI links after suspicions over support provided Nida Khan Nashik TCS conversion case : भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी TCS धर्मांतर निदा खान प्रकरणात AIMIM पक्षाबाबत सिमी या दहशतवादी संघटनेच्या संबंधांचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली.
BJP Radhakrishna Vikhe Patil
BJP Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik TCS conversion case : नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात 40 दिवसांपासून पसार असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक केल्यानंतर तिथं तिला 'AIMIM' पक्षाच्या नगरसेवकानं मदत केल्याचं पुढं आलं आहे. AIMIM पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांच्या रडारवर आला असतानाच, भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात खळबळ उडवून देणारी प्रतिक्रिया दिली आहे.

''AIMIM' पक्षातील काही लोकांचा प्रतिबंधित दहशतवादी संघटना सिमी (स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया) संबंध आहे का? याची देखील सखोल चौकशी सरकारने केली पाहिजे,' असे म्हणत मंत्री विखे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, नाशिकमधील TCS प्रकरण गंभीरच होतं. तसं पूर्वी मी म्हटलंच होतं. या प्रकरणात आता निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आहे. मुख्यमंत्री यांनी देखील अशा प्रकाराचे पाळेमुळे खणून काढून जिहादी वृत्तीचं उच्चाटन करण्याचे आश्वासन दिलं आहे. सरकार त्यादृष्टिने काम करत आहे आणि जशी माहिती समोर येत आहे, तशी कारवाई होत आहे.

'AIMIM' पक्षाकडून निदा खान हिला पसार असल्याच्या काळात मदत झाल्याचे बोलेल जात आहे. यावर मंत्री विखे पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीनगर हे पूर्वीपासून सिमीचं केंद्रचं होतं. त्यामुळे 'AIMIM'ची लोकं सिमीशी संबंधित आहे का? याची देखील सखोल चौकशी सरकारने केली पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं.

BJP Radhakrishna Vikhe Patil
Ashok Kharat ED probe : अशोक खरातचं आर्थिक साम्राज्य उघड! 60 बँक खात्यांतून कोट्यवधींची उलथापालथ; ED तपासात धक्कादायक माहिती समोर

निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधील 'AIMIM'च्या नगरसेवक मतीन पटेल याने मदत केल्याचा संशय आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणात मतीन पटेल याला चौकशीसाठी हजर राहाण्याची नोटीस बजावली आहे. निदा खान हिला 'AIMIM'च्या नगरसेवकाकडून मदत झाल्याचे समोर येताच, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी 'AIMIM'चे इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.

BJP Radhakrishna Vikhe Patil
Nilesh Lanke Controversy : 'तुम्ही कुठलेही कॉन्ट्रोव्हर्सी काढा, तो व्यक्ती दिसणारच'; विखे पाटलांनी केरळम् वरून येताच नीलेश लंकेंना डिवचलं

मंत्री संजय शिरसाट यांनी याप्रकरणात इम्तियाज जलील यांचे नाव घेत चौकशीची मागणी केली. यानंतर मंत्री विखे पाटील यांनी थेट 'AIMIM' पक्षावर निशाणा साधताना, 'AIMIM' पक्षातील काही लोकांचा सिमी संघटनेची संबंध आहे का? असा प्रश्न करत आणखी संशयाचा राजकीय धुरळा उडवून दिला. स्वतः सरकारमधून असून, सरकारकडे चौकशी करावी, अशी मागणी केली.

मंत्री शिरसाट, मंत्री विखे पाटील यांच्या पाठोपाठ भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असल्याचा संशय व्यक्त केला. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलिल व AIMIM नगरसेवकाची, पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com