Devendra-Fadnavis-Eknath-Shinde-Ajit-Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजपच्या 'एकला चलो रे' वर आज मंथन, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची अस्वस्थता दूर होणार का?

BJP's review meeting for elections today, Chief Minister Devendra Fadnavis present, possibility of a decision on the grand alliance -महायुती केल्यास जळगाव आणि नाशिकच्या हक्काच्या काही जागांचा त्याग करण्यास भाजप तयार होणार का? याची चर्चा

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक आज होत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकींचा आढावा यावेळी घेण्यात येईल. या बैठकीसाठी पक्षाचे मंत्री आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक होत आहे. या बैठकीत पक्ष 'एकला चलो रे' धोरण स्वीकारणार की महायुती करणार यावर चर्चा होईल. त्यामुळे या बैठकीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुती म्हणून लढणार अशी घोषणा भाजपने केली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही याबाबत जाहीरपणे वक्तव्य करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र पडद्याआड वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नाशिक महापालिका भाजपचे वर्चस्व होते. या ठिकाणी भाजप स्वबळावर सत्तेत होती. अशा स्थितीत महायुती झाल्यास भाजपच्या हक्काच्या जागा इतरांना द्याव्या लागतील. यावरून वाद निर्माण होणार आहे.

सत्तेत असताना आणि विद्यमान जागांवर प्रबळ उमेदवार असताना भाजप या जागा सोडण्याचा राजकीय त्याग करणार का? हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच भाजपचे काही नेते युती नको याबाबत आग्रही आहेत.

जळगाव जिल्ह्यात याबाबत महायुतीत ओढाताण आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत भाजपचे कान टोचले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.

या निवडणुकीत पक्षाने त्याग करून कार्यकर्त्यांना मोठे केले पाहिजे. एक संघपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. त्यासाठी महायुतीने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे. काही जागांवर तडजोड करावी, असे पाटील यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होत आहे. भाजपने स्वबळावर निवडणुकीच्या तयारीसाठी अन्य पक्षातील अनेकांना पक्षप्रवेश दिला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्याला उत्तर म्हणून मनसेची युती केली आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याची उत्सुकता भाजपच्या सहकारी पक्षांना लागली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT