Nashik Crime: भाजपचे डॅमेज कंट्रोल; प्रकाश लोंढे यांच्या विरोधात दोन कोटींच्या खंडणीचा नवा गुन्हा, राजकीय अस्तित्व संकटात?

Police take action, political criminals in trouble, results of municipal elections-भाजपच्या राजकीय गुन्हेगारांना रेड कार्पेट धोरणानेच नाशिकच्या गुन्हेगारीला मोकळे रान मिळाल्याची चर्चा
Sandip Karnik
Sandip KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics: काहीही करा आणि निवडणुका जिंका हे भाजपचे धोरण होते. वरीष्ठ नेत्यांचाही त्याला मनापासून पाठिंबा होता. नाशिक शहरातील या धोरणामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्षही हतबल झाले होते.

नाशिकच्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सूचना दिल्याचे कळते. त्यामुळे गेले काही दिवस नाशिककरांचे नव्हे तर वादग्रस्त राजकीय नेत्यांचे संकटमोचक ठरलेल्या नेत्याला ओव्हरटेक करावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे अनुकूल परिणामही दिसू लागले आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा हादरा पोलिसांच्या निर्णयाने बसला आहे. संबंध कुटुंबावरच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सातपूर भागातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत होण्यास मदत झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Sandip Karnik
Harshvardhan Sapkal Politics: काँग्रेसने महाविकास आघाडीत टाकला मिठाचा खडा, मनसेला सोबत घेण्यास नकार!

नाशिक शहरात महापालिका निवडणुकीसाठी हंड्रेड प्लसची घोषणा भाजपने केली होती. त्यासाठी ज्या नेत्यांवर भाजपने गुन्हेगारीचे शिक्के मारले, त्यांचेच पक्षात स्वागत करण्याची वेळ आली. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांनाही तंबी देण्यात आली होती.

Sandip Karnik
Ahilyanagar MIM Sabha: अहिल्यानगरमधून इम्तियाज जलील यांचा संग्राम जगताप अन् राणेंना 'करारा जवाब' ; म्हणाले,चिकनी चमेली,चिल्लर,छोटासा चिंटू...

नाशिक शहरात गेल्या सहा महिन्यात ४६ खून झाले. गुन्हेगारांचे मनोबल एवढे वाढले की, समाज माध्यमांवर थेट पोलिसांना आव्हान दिले गेले. आगामी निवडणुकीतील इच्छुक गुन्हेगारांनी थेट फलक लावून आपली छबी चमकवली होती.

या निर्णयाने नुकतेच पोलीस कारवाईमुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यालाही त्याचा फटका बसला आहे. अजय बागुल याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात संबंधित नेत्याने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतल्याचे स्वतःच सांगितले आहे.

यानिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रकाश लोंढे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपये खंडणीसाठी बंगला बळकवण्याचा नवा गुन्हा दाखल झाला आहे. श्री लोंढे यांसह माजी नगरसेविका दीक्षा लोंढे आणि दोन्ही मुलांना विरोधात फलक लावण्याच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांचा ससेमीरा मागे लागल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोंढे कुटुंबीयांना दणका बसला आहे. या कारवाईमुळे आगामी निवडणुकीत भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची उमेदवारी लोंढे यांना मिळणार का? हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com