CM Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shasan Aaplya Dari: सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले अन् अजित पवार इकडे आले; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

CM Shinde Speech Shirdi Sabha: शिर्डीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांची हजेरी घेतली.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: "तीन महिन्यात सरकार पडेल, चार महिन्यात पडेल, असे भाकीत पूर्वी विरोधीपक्ष करत होते. आता मुख्यमंत्री बदलतील, असे बोलत आहेत. यांचे सर्व ज्योतिषी संपले आणि आता आमच्या सोबत दादा (अजित पवार) पण आले आहेत. कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते", असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात विरोधकांची आणि विशेष करून मुख्यमंत्री बदला बाबत वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची हजेरी घेतली.

शिर्डीमध्ये गेल्या महिन्याभरापासून रखडलेला 'शासन आपल्या दारी' उपक्रम अखेर गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार-खासदार, भाजपचे पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर टीका करताना, त्यांनी केंद्राकडे विकासाचे कोणतेही प्रस्ताव पाठवले नाहीत. मागितल्या शिवाय काही मिळत नाही. आता आम्ही मागेल त्या योजना केंद्र सरकार राज्याला देत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

नगर जिल्ह्याला सहकाराची मोठी ओळख असल्याचे सांगत आता केंद्रात अमित शाह देशाचे सहकार मंत्री आहेत. त्यांनी सहकार वाचवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. राज्याला त्याचा निश्चित फायदा होईल, असेही शिंदे म्हणाले.

आमच्या पाठीशी जनता आहे. त्यामुळे माझ्या मुख्यमंत्री पदाला धोका नाही. आम्ही तिघे जण (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) विरोधकांना संताजी-धनाजी सारखे सतत दिसत आहोत. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणारे आहोत, त्यामुळे काळजी नाही. कोणी काही म्हणाले तरी, कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते, असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT