Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama

Ahmednagar News: 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी 600 बस आरक्षित केल्याने प्रवाशांचे हाल; काँग्रेसचे रात्री दीड वाजता आंदोलन

Shirdi Shasan Aplya Dari: शिर्डीत राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम
Published on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : शिर्डी जवळील काकडी विमानतळ परिसरात राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम गुरुवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास 30 हजार लाभार्थी नागरिक जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावापासून कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल 600 बसेसचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आगारांकडे नियमित प्रवासी सेवा देताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवरच श्रीगोंदा एसटी आगारातील एकही बस नियमित प्रवाशांसाठी विविध कारणांनी उपलब्ध राहणार नसल्याने गुरुवारी रात्री दीड वाजताच प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी कार्यकर्त्यांसह श्रीगोंदा एसटी आगारात आंदोलन केले. भाजप सरकारचा निषेध करत एसटी आगराबाहेर जाणाऱ्या बसच्या टायरमधील हवा सोडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

Ahmednagar News
Shivsainik Meet Uddhav Thackeray: ठाकरे गटाचं मिशन लोकसभा; उद्धव ठाकरेंकडून मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका

यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी एसटी आगार नियंत्रकांशी चर्चा करून किमान वीस बसेस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध राहतील, असे लेखी आश्वासन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले.

श्रीगोंदा आगारात एकूण 62 बसेस पैकी 52 बसेस 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर पाच बसेस आरटीओ कामानिमित्त तर पाच बसेस तांत्रिक दुरुस्ती कामामुळे उपलब्ध नसल्याने एकही बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

Ahmednagar News
Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; 350 आमदारांना दिले जाणार विशेष ट्रेनिंग

शालेय विद्यार्थी, नियमित प्रवास करणारे नोकरदार-व्यावसायिक आणि कामानिमित्ताने प्रवास करणारे प्रवाशांचा कोणताही विचार न करता सरकारने दबावाखाली एसटीच्या लालपरीला वेठीला धरल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच आगारातील मिळून 600 बसेस शिर्डी कार्यक्रमासाठी आरक्षित असल्याने जिल्ह्यातील नियमित प्रवासी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. दरम्यान, परिवहन महामंडळाच्या जिल्हा विभाग नियंत्रक मनीषा सकपाळ यांनी नियमित प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्याची काळजी घेण्यात आल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com