Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकचे भाजपचे आमदार करतात तरी काय?

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला सवाल.

Sampat Devgire

नाशिक : आमचे प्रकल्प चालले, विमानसेवा (Air connectivity) चालली आता सिडकोचे (Nashik Cidco) कार्यालय दुसरीकडे चालले. हे सर्व घडताना भाजपचे (BJP) आमदार करतात तरी काय?. सिडकोच्या स्थलांतरामागे राजकारण आहे की अर्थकारण असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal criticised BJP MLA on Cidco office shifting issue)

नाशिक शहरात भाजपचे आमदार आहेत. खासदार आहेत. त्याचे सरकार आहे, ठरवले तर सिडको कार्यालय स्थलांतर सहज थांबवता येईल. परंतु तसे होताना दिसत नाही. यामागे कोणता दाबव आहे असा प्रश्न भुजबळ यांनी केला आहे.

ते म्हणाले, नाशिक मधील सिडकोचे कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.

श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या सिडको वसाहतीत तीन लाखाहून अधिक नागरिकांची वसाहत आहे. या वसाहतीतील नागरिकांचे बरेच काम अद्यापही सिडकोकडे असताना अचानक सिडकोची कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असे सांगत हा निर्णय कोणाच्या दबावत आहे हे अद्याप कळत नाही असे त्यांनी सांगितले.

एकीकडे नाशिकचे अनेक प्रकल्प, विमाने कार्यालय पळविले जात आहे. आता सिडकोचे कार्यालय सुद्धा हलविण्यात आले आहे. पळविण्याचा हा सिलसिला सुरूच असून यावर शहरातील आमदार खासदार नेमकं काय करताय यामागे अन्य काही कारण आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सर्वसामान्य सिडकोवासियांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे असे त्यांनी सांगितले. यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार केला असून अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT