धुळे : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील (Police training centre) प्रवीण विश्वनाथ कदम (५२) (Pravin Kadam) यांनी केंद्रातील निवासस्थानी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Police training centre`s instructor suicide)
आत्महत्येची ही घटना मंगळवारी (ता. १५) सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात कुणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.
तीन वर्षांपासून निरीक्षक कदम येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सेवारत होते. ते केंद्रातीलच सह्याद्री बिल्डिंगमध्ये निवासस्थानी वास्तव्यास होते. ते एकटेच राहात होते, तर त्यांचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहे.
पोलिस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सायंकाळी प्रशिक्षणासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा सराव व कार्यक्रमाचे ते प्रमुख असूनही उपस्थित नसल्याने चौकशी सुरू झाली. काही सहकाऱ्यांनी मोबाईलने संपर्क साधला असता निरीक्षक कदम यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा काही सहकारी निरीक्षक कदम यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे केंद्रात खळबळ उडाली.
निरीक्षक कदम यांनी सकाळीच अनेकांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठविले होते. यानंतर त्यांचा कुणाशीही कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नव्हता. केंद्रात ते कुणालाही दिसले नव्हते. घटनेची माहिती त्यांच्या नाशिकस्थित कुटुंबीयांना कळविण्यात आली.
निरीक्षक कदम यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. निरीक्षक कदम कलाकार, सर्पमित्र, वृक्षप्रेमी, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना संगीत, गायनाची आवड होती. केंद्रात २१ नोव्हेंबरला होणाऱ्या दीक्षांत समारंभात सांस्कृतिक, संगीत कार्यक्रमाची जबाबदारी निरीक्षक कदम यांच्याकडे होती. घटनेमुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रासह पोलिस दलात हळहळ व्यक्त झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.