Bharat Gavit & Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Navapur Politics: भरत गावित, चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले भाजपला आव्हान, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच जाहीर करीत दिला विजयकुमार गावित यांना संदेश!

Clash between Chandrakant Raghuvanshi and Vijay Gavit in Navapur, Shiv Sena Shinde and Ajit Pawar unite, Shiv Sena breaks the grand alliance-नवापूरला महायुतीत फूट, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून भाजपला खिंडीत गाठण्याचा राजकीय डाव

Sampat Devgire

Navapur Mahayuti News: नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचे राजकारण जोमात आहे. त्यात माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय संघर्षाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे महायुतीतच दुफळी निर्माण झाली आहे.

भाजपने नंदुरबार जिल्ह्याची सर्व सूत्रे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्यावर सोपविली आहे. डॉ गावित आणि अन्य सर्व पक्ष व नेते असे जिल्ह्यात चित्र आहे. त्याचे पडसाद नगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत.

नवापूर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते भरत गावित यांनी कंबर कसली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांना साथ दिली आहे. या नेत्यांनी युतीची घोषणा करून जयवंत जाधव यांची नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी देखील जाहीर केली.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाने देखील आपली ताकद पणाला लावली आहे. नवापूर मध्ये माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचा प्रभाव आहे. मात्र त्यांची प्रकृती बरी नाही. महायुतीत फूट पडली असताना काँग्रेसने स्वबळावर निवडणुकीची तयारी केली. इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या.

आमदार रघुवंशी आणि भरत गावित यांनी नवापूरसाठी निवडणुकीसाठी स्मार्ट सिटीचा मास्टर प्लॅन घोषित केला. नवापूर पालिकेत जनता आमच्याबरोबर आहे. त्यांना शहराचा विकास हवा आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

पुढील चाळीस वर्षाचा विचार करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. औद्योगीकरणासाठी आणि स्थलांतर रोखण्यासाठी औद्योगिक वसाहत उभारली जाईल. शहरातील सर्व रस्ते उत्तम होतील. शहराच्या विकासाचा अर्थात स्मार्ट सिटीचा प्लॅन यावेळी जाहीर करण्यात आला.

नवापूर नगरपालिका निवडणुकीत आमदार रघुवंशी आणि भरत गावित एकत्र आले. महायुतीचे दोन पक्ष यानिमित्ताने निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परंपरागत काँग्रेस आणि महायुतीचा घटक भाजप अशा तिहेरी लढतीचा निकाल काय लागतो याची उत्सुकआहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT