NCP warning to BJP : 'वाटेला गेला तर, विधानसभा सभागृहात देखील...'; भाजपच्या पडळकरांना अजितदादांच्या शिलेदारानं थेट सुनावलं

Kiran Lahamate of Ajit Pawar NCP warns BJP leader Gopichand Padalkar over tribal reservation issue in Akole : आदिवासी आरक्षणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना इशारा दिला आहे.
Kiran Lahamate
Kiran LahamateSarkarnama
Published on
Updated on

Tribal Reservation Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकोले इथले आमदारक किरण लहामटे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलाच दम भरला आहे.

"पडळकरची आमच्या नजरेत नजर घालून पहायची हिंमत नाही. आमशादादा आणि मी उभा असलो तर, तो कोसो मैलाने दूर जातो. आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासींच्या वाटेला गेला तर, त्याला विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही," असा इशारा आमदार किरण लहामटे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर इथं आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार लहामटे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासींच्या वाटेला गेला तर, त्याला विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती अकोले तालुक्यातील राजूर गावात मोठ्या उत्साहात पार पडली. राजूर गावात निघालेल्या मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी आमदार किरण लहामटे यांना खांद्यावर उचलून घेत पारंपरिक नृत्यावर ठेका धरला.

Kiran Lahamate
Parth Pawar land scam : चव्हाण, निलंगेकर अन् देशमुखांचे राजीनामे; पार्थ पवार जमीन व्यवहारावर भाष्य, तीन वेळा फाईल समोर आणली, थोरातांचा दावा

आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरुन आमदार किरण लहामटे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह धनगर आणि बंजारा नेत्यांवर निशाणा साधला. काहींना आदिवासींमध्ये येण्याचे डोहाळे लागलेत, मात्र आमच्यात कुणी येऊ शकत नाही, असे आमदार लहामटे यांनी ठामपणे सांगितलं.

Kiran Lahamate
Top 10 News: पार्थ पवार प्रकरण 'दिल्ली दरबारी' ते नितेश राणेंचा करेक्ट कार्यक्रम? मुस्लिमांबाबतच 'ते' वक्तव्य भोवलं

आमदार लहामटे म्हणाले, "1978 सालापासून धनगर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. . 2022 मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागल्याने धनगरांचा आदिवासींमध्ये येण्याचा प्रश्न मिटला. निवडणुका जवळ आल्याने काहींना आदिवासींमध्ये येण्याचे डोहाळे लागलेत."

'आमच्या मागे भारतरत्न डाॅ. बाबासाहेबांची घटना आहे. एससी आणि एसटीला संविधानिक आरक्षण असून याच्यात कुणी येऊ शकत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासींच्या वाटेला गेला तर, गोपीचंद पडळकराला विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही,' असा इशारा आमदार किरण लहामटे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com